घरक्रीडाISSF World Cup : महाराष्ट्राच्या राही सरनोबतची ‘सुवर्ण’ कामगिरी

ISSF World Cup : महाराष्ट्राच्या राही सरनोबतची ‘सुवर्ण’ कामगिरी

Subscribe

यंदाच्या नेमबाजी वर्ल्डकप स्पर्धेतील हे भारताचे पहिलेच सुवर्णपदक ठरले.

भारताची आघाडीची नेमबाज राही सरनोबतने आयएसएसएफ नेमबाजी वर्ल्डकप (ISSF World Cup) स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. महाराष्ट्राची कन्या राहीने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण कामगिरी केली. क्रोएशिया येथे होत असलेल्या यंदाच्या नेमबाजी वर्ल्डकप स्पर्धेतील हे भारताचे पहिलेच सुवर्णपदक ठरले. याआधी भारताला एक रौप्य आणि दोन कांस्यपदके मिळाली होती. भारताची स्टार युवा नेमबाज मनू भाकरला मात्र चांगली कामगिरी करता आली नाही. तिला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

- Advertisement -

३९ गुणांसह सुवर्णपदक पटकावले

३० वर्षीय राहीने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत ३९ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. तिने अंतिम फेरीच्या तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मालिकेमध्ये अचूक वेध घेतला. फ्रान्सच्या माथिलदे लमोल्लेने ३१ गुणांसह रौप्यपदक जिंकले. त्याआधी पात्रता फेरीत राहीने ५९१ गुणांसह दुसरा क्रमांक मिळवत अंतिम फेरी गाठली होती.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -