घरक्रीडाजस्टिन लँगर यांचे प्रशिक्षकपद धोक्यात? मार्गदर्शनाच्या पद्धतीत बदल करण्यासाठी दडपण

जस्टिन लँगर यांचे प्रशिक्षकपद धोक्यात? मार्गदर्शनाच्या पद्धतीत बदल करण्यासाठी दडपण

Subscribe

ऑस्ट्रेलियाचे ४० खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांना लँगर यांच्या प्रशिक्षक म्हणून कामाविषयी टिपण्णी करण्यास सांगण्यात आले होते.

ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टिन लँगर यांचे पद धोक्यात येण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियातील क्रिकेट मोसमाची सांगता झाली असून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने लँगर यांच्या कामगिरीची समीक्षा केली. लँगर यांना प्रशिक्षकपदी कायम राहायचे असल्यास त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाच्या पद्धतीत आणि शैलीत बदल करणे गरजेचे आहे, अशी ताकीद क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली आहे. ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्र ‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’ने याबाबतची माहिती दिली. ऑस्ट्रेलियाचे ४० खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांना लँगर यांच्या प्रशिक्षक म्हणून कामाविषयी टिपण्णी करण्यास सांगण्यात आले होते. त्यांच्या प्रतिक्रियांनंतर लँगर यांना त्यांच्या मार्गदर्शनाच्या पद्धतीत बदल करण्याची ताकीद देण्यात आली आहे.

लँगर यांच्या मार्गदर्शनात संमिश्र यश

२०१८ मध्ये बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर डॅरेन लिहमन ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार झाले. त्यांच्या जागी लँगर यांची वर्णी लागली होती. मात्र, त्यांच्या मार्गदर्शनात ऑस्ट्रेलियाला संमिश्र यश मिळाले आहे. यावर्षाच्या सुरुवातीला भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात २-१ असे पराभूत केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंनी लँगर यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती.

- Advertisement -

लँगर यांना प्रत्युत्तर देण्याची संधी

खेळाडूंनी संघाचे व्यवस्थापक गॅविन डोवी यांच्याविषयीही तक्रार केली आहे. आता लँगर यांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाला प्रत्युत्तर देण्याची संधी मिळणार आहे. ते त्यांच्या मार्गदर्शनाच्या पद्धतीत बदल करण्यास तयार असले, तरच क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्यांना पुन्हा प्रशिक्षक म्हणून करारबद्ध करण्याचा विचार करण्याची शक्यता आहे. यंदा टी-२० वर्ल्डकप आणि त्यानंतर अ‍ॅशेस मालिका होणार असल्याने ऑस्ट्रेलियासाठी हे वर्ष खूप महत्वाचे आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -