घरक्रीडावीस हजारी कोहली दशकात सर्वोत्तम!

वीस हजारी कोहली दशकात सर्वोत्तम!

Subscribe

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील ४३ वे, तर वेस्ट इंडिजविरुद्धचे नववे शतक होते. त्यामुळे एका संघाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या सचिन तेंडुलकरच्या (ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ शतके) विक्रमाशी त्याने बरोबरी केली. तसेच या सामन्यात कोहलीने एक विक्रम आपल्या नावे केला. एका दशकात (१० वर्षे) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०,००० धावांचा टप्पा पार करणारा तो पहिला क्रिकेटपटू आहे.

याआधी एका दशकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पॉन्टिंगच्या नावे होता. ऑस्ट्रेलियाच्या या माजी कर्णधाराने २००० च्या दशकात १८,९६२ धावा केल्या होत्या. या यादीत तिसर्‍या क्रमांकावर जॅक्स कॅलिस असून त्याने एका दशकात १६७७७ धावा केल्या. भारताकडून एका दशकात सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकरनेच केल्या होत्या. २००० च्या दशकात सचिनच्या नावे १५९६२ धावा होत्या. नुकत्याच निवृत्त झालेल्या हाशिम आमलाने २०१० च्या दशकात १५१८५ धावा केल्या.

- Advertisement -

कर्णधार म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके लगवण्याच्या रिकी पॉन्टिंगच्या विक्रमापासून कोहली आता एक शतक दूर आहे. पॉन्टिंगने कर्णधार असताना २२ शतके लगावली होती, तर कोहलीच्या नावे २१ शतके आहेत.

एका दशकात सर्वाधिक धावा

- Advertisement -

१. विराट कोहली – २०,०१८ धावा
२. रिकी पॉन्टिंग – १८,९६२ धावा
३. जॅक कॅलिस – १६,७७७ धावा
४. महेला जयवर्धने – १६,३०४ धावा
५. कुमार संगकारा – १५,९९९ धावा
६. सचिन तेंडुलकर – १५,९६२ धावा
७. राहुल द्रविड – १५,८५३ धावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -