पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे मेरी कोमचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले

Mary Kom
मेरी कॉम

भारताच्या महिला बॉक्सर मेरी कोमचे जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले असून तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. उपांत्य फेरीत टर्कीच्या बुसेन्झ कैरोग्लुने मेरी कोमला पराभूत केले आहे. मात्र सामना संपल्यानंतर काही मिनीटांमध्येच मेरी कोमने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पंचांच्या निर्णयाविरोधात आपली नाराजी व्यक्त केली आहे. हा सामना १ विरुद्ध ४ च्या फरकाने पंचांनी टर्कीच्या बुसेन्झच्या बाजूने दिला आहे.

रशियातील उलान-उडे येथे ही स्पर्धा सुरू असून ५१ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत टर्कीच्या बुसेनाझ कॅकिरोग्लूने मेरी कोमवर मात केली आहे. पहिल्या दोन राऊंडपर्यंत सामना अटीतटीचा झाला. मात्र अखेरच्या राऊंडमध्ये टर्कीच्या बुसेनाझने वर्चस्व मिळवले. त्यामुळे टर्कीच्या खेळाडूने १ विरुद्ध ४ अशा फरकाने बाजी मारली. दरम्यान, उपांत्य फेरीतील सामन्यात पंचांनी दिलेल्या निर्णयावर भारताने आक्षेप घेतला असून या विषयी भारताने अपील केले होते, परंतू आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने ते फेटाळून लावले.