घरक्रीडाकठीण परिस्थितीत खेळायला आवडते!

कठीण परिस्थितीत खेळायला आवडते!

Subscribe

वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला गरज असताना सलग दोन सामन्यांत अर्धशतके करणार्‍या युवा फलंदाज श्रेयस अय्यरचे कर्णधार विराट कोहलीने कौतुक केले. दुसर्‍या आणि तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात संघ अडचणीत असताना श्रेयसने कर्णधार कोहलीला उत्तम साथ दिली. या मालिकेत मिळालेल्या संधीसाठी श्रेयसला दीड वर्ष वाट पाहावी लागली होती. मात्र, त्याने या संधीचे सोने केले.

तिसर्‍या सामन्यात २५५ धावांचा पाठलाग करताना भारताची ३ बाद ९१ अशी अवस्था होती. त्याने कोहलीच्या साथीने १२० धावांची भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला. या सामन्याप्रमाणे कठीण परिस्थिती असताना मला फलंदाजी करायला आवडते, असे श्रेयसने या सामन्यानंतर सांगितले.

- Advertisement -

मी या सामन्यात केलेल्या कामगिरीबाबत खुश आहे. कठीण परिस्थिती असताना आणि ड्रेसिंग रूममध्ये सर्व सदस्य दबावात असताना मला फलंदाजीसाठी मैदानात उतरायला आवडते. कारण या परिस्थितीत तुम्हाला सामना आपल्या संघाच्या बाजूने फिरवण्याची संधी असते, असे श्रेयस म्हणाला.

श्रेयसच्या खेळीबाबत विराट कोहलीने तिसर्‍या सामन्यानंतर सांगितले, श्रेयसमध्ये खूप आत्मविश्वास आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीला घाबरत नाही. या सामन्यात तो बाद होईल असे कोणत्याही क्षणी वाटले नाही. मला आशा आहे की तो यापुढेही अशी कामगिरी सुरु ठेवेल आणि तसे झाल्यास तो लवकरच मधल्या फळीत आपले स्थान पक्के करेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -