घरक्रीडाMahendra Singh Dhoni: धोनीच्या 'थलायवी' लूकने केला सोशल मीडियावर धुरळा, पाहा धोनीचा...

Mahendra Singh Dhoni: धोनीच्या ‘थलायवी’ लूकने केला सोशल मीडियावर धुरळा, पाहा धोनीचा नवा अवतार

Subscribe

टीम इंडियाचा माजी यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सध्या जोरदार चर्चेत आहे. त्याची प्रत्येक गोष्ट चाहत्यांना भुरळ घालतेय. मग त्याची हेअर स्टाईल असो वा फॅशन वा कधी शेतात राबतानाचा अवतार. चाहत्यांना त्याचे वेगळे लूक नेहमीच आवडतात. नुकतंच आगामी आयपीएल २०२२ साठी चेन्नईचा सुपर किंग्जकडून रिटेन खेळाडूंची नावे जाहीर झाली. यामध्ये महेंद्र सिंह धोनीच्या नावाचाही समावेश आहे. यातच सर्वांच्या आवडत्या माहीचा अर्थात महेंद्र सिंग धोनीचा एक हटके फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. धोनीच्या ‘थलायवी’ लूकमधील या फोटोने सध्या सोशल मीडियावर धुरळा केलाय. चेन्नईचा सुपर किंग्ज संघाचा ‘थलाइवा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीचा हा एक कार्टून फोटो आहे.

व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पिवळ्या रंगाच्या लुंगीमध्ये खंटी थलाइवाच्या लूकमध्ये खुर्चीवर बसलेला दाखवण्यात आलाय. मात्र या फोटोमध्ये धोनी एकटा नाही, त्याच्यासोबत टीमचे दोन्ही फिरकीपटू मोईन अली आणि रवींद्र जडेजा हे अगदी मागे उभे असल्याचे पाहायला मिळतेय, तर चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडही एका साईडला अगदी स्टाईलमध्ये उभा असलेला दिसतोय. धोनीसह या खेळाडूंचा हा रावडी अंदाज आता चाहत्यांनाही अधिक आवडतोय.

- Advertisement -

आयपीएल २०२१ ची चॅम्पियन टीम चेन्नई सुपर किंग्जच्या या चार सुपरस्टार्सचे हे कार्टून सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. या कार्टूनवर आत्ता चाहत्यांकडून भरपूर लाईक्स आणि भन्नाट-भन्नाट कमेंट्स मिळत आहेत.

चेन्नई सुपर किंग्ज संघ सध्या २०२२ च्या आयपीएलसाठी सर्व तयारी करत आहे. २०२२ मध्ये पाचव्यांदा आयपीएलच्या विजेतेपदाची ट्रॉफी मिळविण्यासाठी मेगा लिलावापूर्वी संघाने आपल्या चार प्रमुख खेळाडूंना कायम ठेवले आहे. यामध्ये धोनीच्या नावाचाही समावेश आहे. व्हिसल पॉडू क्लब आणि सीएसके फॅन्स क्लबने प्रसिद्ध केलेल्या या कार्टूनमध्ये तेच खेळाडू आहेत ज्यांना संघाने रिटेन केले आहे. यावेळी चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापनाने पहिला खेळाडू रवींद्र जडेजाला १६ कोटींची सर्वाधिक रक्कमेत संघात कायम ठेवले आहे. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीला १२ कोटींहून अधिक रक्कम मोजत संघात कायम ठेवले आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -