घरक्रीडा'२०१९च्या वर्ल्डकप टीममध्ये धोनी हवा'

‘२०१९च्या वर्ल्डकप टीममध्ये धोनी हवा’

Subscribe

२०१९च्या वर्ल्डकपसाठी धोनी संघात हवा अशी प्रतिक्रिया सुनिल गावस्कर यांनी दिली आहे. धोनी संघात असल्यास त्याचा फायदा हा विराट पर्यायानं संघाला होईल असं देखील गावस्कर यांनी म्हटलं आहे.

आगामी वेस्ट विंडीज आणि ऑस्ट्रेलिया टी-२० दौऱ्यातून बीसीसीआयनं महेंद्रसिंह धोनीला संघातून वगळलं आहे. त्यावरून सध्या सोशल मीडियासह सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. धोनी संघात हवा की नको? धोनी संपला! त्याला मुद्दामहून वगळलं गेलं अशा अनेक चर्चा सध्या सुरू आहेत. शिवाय, २०१९च्या वर्ल्डकपमध्ये धोनी खेळणार की नाही? यावर देखील सध्या चर्चा झडत आहेत. पण, धोनीच्या समर्थनार्थ माजी क्रिकेटर लिटल मास्टर सुनिल गावस्कर मैदानामध्ये उतरले आहेत. ‘२०१९च्या वर्ल्डकपसाठी महेंद्रसिंह धोनी संघात हवा’ असं मत सुनिल गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे. ‘विराटला धोनीची गरज आहे. त्याबद्दल कोणतीही शंका नाही. बॉलर्सना सल्ले देणे, DRSचे निर्णय घेणं. या सर्व गोष्टींचा संघाला पर्यायानं विराट कोहलीला फायदा होणार आहे’. अशा शब्दात सुनिल गावस्कर यांनी धोनीला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

मागील काही दिवसांपासून धोनी खेळ मंदावला आहे. जास्त बॉल्स खेळून अपेक्षित धावा काढणं धोनीला जमलेलं नाही. त्यावरून धोनीवर टीका देखील होत आहे. त्याचच परिणाम म्हणून धोनीला आगामी वेस्ट विंडीज आणि ऑस्ट्रेलिया टी-२० दौऱ्यातून वगळल्याचं बोललं जात आहे. शिवाय, धोनी २०१९च्या वर्ल्डकपमध्ये असेल की नाही? याबद्दल शंका उपस्थित केल्या गेल्या. पण आता सुनिल गावस्कर यांनी धोनीची पाठराखण करत वर्ल्डकपसाठी धोनी संघात हवा असं म्हटलं आहे.

- Advertisement -

वाचा – धोनीला विंडीज, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० संघातून वगळले

आणखी काय म्हणाले गावस्कर

यावेळी सुनिल गावस्कर यांनी हिटमॅट रोहित शर्माचं देखील कौतुक केलं. अडचणीच्या काळात रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे सारखे खेळाडू विराटच्या मदतीला आहेत. त्यामुळे धोनीला टी-२० मधून विश्रांती देण्यात आली असावी असा अंदाज देखील गावस्कर यांनी यावेळी व्यक्त केला.

सध्या धोनीच्या जागी ऋिषभ पंतला संघात स्थान देण्यात आलं आहे. धोनीच्या जागी पर्याय शोधण्याचा हा प्रयत्न बोललं जात आहे. मात्र ऋिषभ पंत की धोनी याबद्दल आपल्ल्या काही काळ वाट पाहावी लागेल.

वाचा – धोनी निवृत्त हो – भाजप मंत्री, नेटिजन्सनी घेतला समाचार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -