घरक्रीडाIPL मध्ये पुन्हा एकदा मॅच फिक्सिंग? एका ड्रायव्हरने साधला मोहम्मद सिराजशी संपर्क

IPL मध्ये पुन्हा एकदा मॅच फिक्सिंग? एका ड्रायव्हरने साधला मोहम्मद सिराजशी संपर्क

Subscribe

आयपीएल २०२३ च्या १६व्या हंगामाला सुरूवात झाली असून पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगचा प्रकार झाल्याची माहिती समोर आली आहे. रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजशी हे प्रकरण संबंधित असून त्याने बीसीसीआयला यासंदर्भात माहिती दिली आहे. एका ड्रायव्हरने आयपीएलवर सट्टा लावला होता. परंतु सट्ट्यात पैसे गमावल्यानंतर त्याने ड्रायव्हरशी संपर्क साधला. यावेळी त्याने सिराजला मोठी ऑफर देऊ केली.

जर तू मला संघासंबंधी अंतर्गत माहिती दिली तर मी तुला मोठी रक्कम देऊ शकतो, अशी ऑफर त्या ड्रायव्हरने सिराजला दिली. मात्र, या प्रकरणानंतर सिराजने याची संपूर्ण माहिती बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी विभागाला दिली आहे.

- Advertisement -

मोहम्मद सिराजने बीसीसीआयला माहिती दिल्यानंतर तत्काळ कारवाई करण्यात आली आहे. तसेच या संबंधित एका चालकाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान मोहम्मद सिराजशी संपर्क साधणारी व्यक्ती कोणी सट्टेबाज नसून, चालक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सिराजशी संपर्क साधणारा कोणी सट्टेबाज नव्हता. तो हैदराबादचा एक चालक आहे, जो सामन्यांवर सट्टा लावतो. त्याने सट्टेबाजीत बरेच पैसे गमावले होते. यामुळे त्याने संघातील अंतर्गत माहिती मिळवण्यासाठी सिराजशी संपर्क साधला होता.

- Advertisement -

मॅच फिक्सिंग प्रकरणी याआधी श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजीत चंदिला यांना अटक करण्यात आली होती. या तिघांसह चेन्नई सुपरकिंग्जचे गुरुनाथ मयप्पन यांच्यावरही अटकेची कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून बीसीसीआय सतर्क आहे.


हेही वाचा : IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरची कॅमेरामनला शिवीगाळ?, व्हिडीओ तुफान व्हायरल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -