घरक्रीडामिताली राजला 'प्लेयर ऑफ द मॅच' साठी मिळाले केवळ १७००० रूपये

मिताली राजला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ साठी मिळाले केवळ १७००० रूपये

Subscribe

टी-२० वुमन्स आशिया कप मलेशियात सुरू आहे. ज्यातील भारत विरुद्ध मलेशिया सामन्यात भारताने १४२ रनांनी विजय मिळवला. या विजयाची शिल्पकार मिताली राजच्या नाबाद ९७ धावांसाठी तिला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ हा पुरस्कार दिला गेला. मात्र पुरस्काराची रक्कम केवळ २५० डॉलर असल्याने क्रिकेट फॅन्सकडून निराशा व्यक्त केली जात आहे.

सोशल मीडियावर व्यक्त केली नाराजी

मिताली राजला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ हा पुरस्कार मिळाल्यानंतर इन्स्टाग्रामवर तिचे फोटो ‘इंडियन क्रिकेट टीम’च्या ऑफिशिअल अकाऊंटवर पोस्ट करण्यात आले. या फोटोवरच्या कंमेट्समधून फॅन्सने आपली निराशा व्यक्त केली आहे. पुरूष क्रिकेटर्सना प्लेयर ऑफ द मॅच म्हणून मिळणारी रक्कम किमान २००० डॉलर असते. पुरूष आणि महिला क्रिकेटर्समधील या फरकामुळे क्रिकेट जगतातून खंत व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -
mitali raj photo on instagram
इंडियन क्रिकेट टीमच्या ऑफिशिअल अकाऊंटवरील पोस्ट

क्रिकेटर्सना मिळणाऱ्या रकमेत कमालीची तफावत

पुरूष क्रिकेटर्सना पुरस्कारात मिळणारी रक्कम ही महिला क्रिकेटर्सच्या तुलनेत खूप जास्त आहे. महिलांना मिळणाऱ्या २५० डॉलरच्या १० पट पुरूषांना मिळतात. महिला आणि पुरूष क्रिकेटमधील हा फरक सगळ्या स्तरात जाणवून येतो. मगते महिलांचे वर्ल्ड कप असो किंवा इतर सामने ही तफावत सातत्याने जाणवते. आयपीएल मधील सामन्यांतील पुरस्काराची रक्कम लाखो रुपयांच्या घरात असते. याउलट आंतरराष्ट्रीय महिला सामन्यांतील पुरस्काराची रक्कम केवळ २५० डॉलर म्हणजेच अवघे १७००० रुपये आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -