घरक्रीडाशमीची पत्नी पुन्हा एकदा मॉडेलिंगसाठी सज्ज

शमीची पत्नी पुन्हा एकदा मॉडेलिंगसाठी सज्ज

Subscribe

मोहम्मद शमीची पत्नी हसन जहांने मॉडेलिंग क्षेत्रात पुनरागमन केले आहे.

क्रिकेटर मोहम्मद शमीवर गंभीर आरोप करणारी त्याची पत्नी हसीन जहॉं पुन्हा एकदा मॉडेलिंग विश्वात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रतिष्ठीत जीवन जगण्यासाठी आणि आपल्या तीन वर्षाच्या मुलीच्या पालनपोषणसाठी हा निर्णय घेतला असल्याचे तिने सांगितले आहे. हसीनने आपल्या पतीवर विवाहबाह्य संबंध, मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. सोशल मीडियावर शमीने केलेल्या चॅटचे फोटो टाकून हसीनने खळबळ उडवून दिली होती. शिवाय, मोहम्मद शमीवर मॅच फिक्सिंगचा देखील आरोप केला होता. त्यामुळे दोघे पती-पत्नी चांगले चर्चेत आले होते.

का केले मॉडेलिंगमध्ये पुनरागमन?

हसीनने कोर्टामध्ये आपल्या पतीकडून मुलीच्या व स्वत:च्या खर्चासाठी दरमहा १० लाख रुपये मिळावे, अशी मागणी केली होती. हसीन जहॉंने केलेल्या आरोपांची तपासणी पोलिसांकडून सुरु आहे. परंतु, या दरम्यान हसीनला पैशांची गरज भासत आहे. मोहम्मद शमीसोबत लग्न करण्याअगोदर हसीन मॉ़डेलिंगच्या क्षेत्रात काम करत होती. लग्न झाल्यानंतर तिने मॉडेलिंग क्षेत्राला रामराम ठोकला होता. परंतु, यासाठीही शमीने तिला मॉडेलिंग न करु देण्याचा आरोप तिने केला आहे. या सगळ्या वादानंतर हसीन जहॉं पुन्हा मॉडेलिंगमध्ये उतरली आहे. शनिवारी संध्याकाळी तिने ट्विटरवर मॉडेलिंगचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

- Advertisement -

जुन्या मित्रांनी घेतली मदत

हसीन आपल्या कामासाठी कोलकाता आणि मुंबई दरम्यान प्रवास करत आहे. तिने दोन महिन्याअगोदर आपल्या जुन्या मित्रांशी संपर्क साधला. हसीन जहॉंने सांगितले की, ‘आपल्या जुन्या मित्रांना फोन करण्याअगोदर मी दचकत होते, परंतु मला माझ्या मुलीच्या उज्जवल भविष्यासाठी काम करायला हवे म्हणून त्यांची मदत घेण्याचा निर्णय मी घेतला आणि त्यांनीसुद्धा मला मदत केली ‘. आपल्याला स्वाभिमानाने जगता यावे, यासाठीच आपण मॉडेलिंग करणार असल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -