घरक्रीडाधबधब्याखाली धोनी, व्हिडिओ व्हायरल!

धबधब्याखाली धोनी, व्हिडिओ व्हायरल!

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला असून त्याने रांचीतील एका धबधब्याखाली धमाल करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

प्रत्येकालाच आपल्या चांगल्या जुन्या आठवणींत रमायला आवडतं. पुन्हा त्या जगायला आवडतं. अशाच आपल्या जुन्या आठवणीवर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात धोनी रांचीतील एका धबधब्याखाली मजा करताना दिसून येत आहे.

कसोटीतून निवृत्तीनंतर धोनी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी आपला जास्त वेळ आपली फॅमिली आणि सोशल मीडियावर घालवताना दिसून येतोय. नुकताच काही दिवसांपूर्वी धोनीने एका छोट्या सायकलवरून स्टंट करतानाचा एक व्हिडिओही शेअर केला होता. त्यानंतर आता त्याने रांचीतील एका धबधब्याखाली मजा करतानाचा एक स्लोमोशन व्हिडिओ शेअर केला आहे.

- Advertisement -

वाचा – धोनी म्हणतो, ‘हा स्टंट नक्की करुन बघा’!

 

Just for fun, plz try it at home.

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

- Advertisement -

नक्की काय आहे व्हिडिओ?

धोनीने आपल्या ऑफिशिअल इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात तो रांचीतील एका धबधब्याखाली मजा करताना दिसून येत आहे. व्हिडिओसोबतच धोनीने लिहीले आहे की, “रांचीतील या तीन धबधब्यांखाली पूर्वी आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही जायचो, पण आता जवळपास १० वर्षांनंतर ही धमाल अनुभवण्यात काही वेगळीच मजा आहे.”

धोनीच्या निवृत्तीचीही झाली होती चर्चा

काही दिवसांपूर्वीच धोनी एकदिवसीय सामन्यातूनही निवृत्ती घेतो की काय? अशा चर्चेला उधाण आले होते. इंग्लंडविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामन्यात पराभूत झाल्यानंतर धोनीच्या संथ बॅटिंगमुळे भारताला ही मालिका गमवावी लागल्याची चर्चा होती. अशावेळी सामना झाल्यानंतर दरवेळी स्टम्प नेणाऱ्या धोनीने अंपायरकडून बॉल नेल्याने त्याच्या रिटायरमेंटच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र त्यानंतर भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी खुलासा केला की धोनीने इंग्लंडमधील खेळपट्टीचा अंदाज यावा म्हणून बॉल नेला होता. शास्त्रींच्या या खुलाशानंतर धोनीच्या निवृत्तीच्या सर्व अंदाजांना फुलस्टॉप लागला.

वाचा – धोनीची वनडेतून निवृत्ती…?

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -