घरक्रीडाIPL 2020 : धोनी दमदार कामगिरी करेल, पण त्याला वेळ द्या - फ्लेमिंग

IPL 2020 : धोनी दमदार कामगिरी करेल, पण त्याला वेळ द्या – फ्लेमिंग

Subscribe

राजस्थानविरुद्ध धोनीने १७ चेंडूत नाबाद २९ धावांची खेळी केली. 

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला, याबाबत बरीच चर्चा होत आहे. धोनी हा क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फिनिशर्सपैकी एक मानला जातो. त्याने अनेकदा चेन्नई आणि भारताला अशक्यप्राय वाटणारे विजय मिळवून दिले आहेत. राजस्थानविरुद्ध त्याने १७ चेंडूत नाबाद २९ धावांची खेळी केली, ज्यात सलग ३ षटकारांचाही समावेश होता. मात्र, त्याला चेन्नईला विजय मिळवून देता आला नाही. धोनीमध्ये अजूनही चेन्नईला सामने जिंकवून देण्याची क्षमता आहे. मात्र, तो बराच काळ क्रिकेटपासून दूर असल्याने त्याला अजून सर्वोत्तम कामगिरी करता येत नाहीये. परंतु, लवकरच आपल्याला पुन्हा जुना धोनी दिसेल याची चेन्नईचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांना खात्री आहे.

लोकांना त्याच्याकडून खूप अपेक्षा

धोनी कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार? याबाबत प्रत्येक मोसमाआधी चर्चा होते. या सामन्यात तो सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला असला, तरी त्यावेळी १४ वे षटक सुरु होते. त्यामुळे धोनीकडे पुरेसा वेळ होता. धोनी आता बऱ्याच काळानंतर पुन्हा क्रिकेट खेळत आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. लोकांना त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. तो या अपेक्षा पूर्ण करेल. तो दमदार कामगिरी करेल, पण त्याला थोडा वेळ दिला पाहिजे. काही सामने खेळल्यावर तो त्याचा सर्वोत्तम खेळ करताना दिसेल. या सामन्यातही शेवटच्या षटकात त्याने मोठे फटके लगावले. त्यामुळे आम्हाला त्याच्या किंवा इतर फलंदाजांच्या फॉर्मची फारशी चिंता नसल्याचे फ्लेमिंग यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -