घरक्रीडाधोनीने निवृत्तीसाठी १५ ऑगस्ट ही तारीख का निवडली? कारण आले समोर

धोनीने निवृत्तीसाठी १५ ऑगस्ट ही तारीख का निवडली? कारण आले समोर

Subscribe

भारताला आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकवून देणारा भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने काल १५ ऑगस्टला संध्याकाळी निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतलेल्या निवृत्तीच्या घोषणेने सर्वजण चकित झाले. इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत संध्याकाळी सात वाजून २९ मिनीटांनी मी निवृत्त होत आहे असं समजावं, असं धोनीने म्हटलं. धोनीने निवृत्तीसाठी १५ ऑगस्ट आणि ७ वाजून २९ मिनीटांचीच वेळ का निवडली? यावरुन चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, याचा उलगडा आता झाला आहे. धोनीचा मॅनेजर मिहीर दिवाकर यांनी धोनीने १५ ऑगस्टलाच निवृत्ती का जाहीर केली यामागील कारण सांगितलं आहे.

“धोनीने आपल्या पूर्ण कारकिर्दीत भारतीय संघासाठी मोठं योगदान दिलं असून तो खऱ्या अर्थाने एक सच्चा देशभक्त आहे. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला रामराम करण्यासाठी १५ ऑगस्टपेक्षा जास्त चांगला दिवस सापडलाच नसता. गेल्या काही महिन्यांपासून धोनीची निवृत्तीबद्दलची चर्चा सुरु होती, पण कधी निवृत्ती घ्यायची याबाबत त्याला योग्य वेळ मिळत नव्हती. यापुढे आयपीएल हे त्याचं प्राधान्य असणार आहे,” अशी माहिती इंडिया टुडेशी बोलताना मिहीर दिवाकर यांनी दिली.

- Advertisement -

२०१९ विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्धचा उपांत्य सामना हा धोनीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब होता. ऑस्ट्रलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषक खेळत धोनी निवृत्त होणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, कोरोनामुळे टी-२० विश्वचषक रद्द करावा लागला. विश्वचषक लांबणीवर गेल्याने ४० वर्षीय धोनीने निवृत्तीचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.


हेही वाचा – निवृत्तीनंतर भाजपच्या ‘या’ नेत्याने दिली धोनीला निवडणूक लढविण्याची ऑफर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -