घरक्रीडामुंबई मॅरेथॉनमध्ये ५५ वर्षीय धावपटूचा हृदयविकाराने मृत्यू

मुंबई मॅरेथॉनमध्ये ५५ वर्षीय धावपटूचा हृदयविकाराने मृत्यू

Subscribe

रविवारी मुंबई मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. कोरोनामुळे मुंबई मॅरेथॉन झाली नव्हती. त्यामुळे रविवारी झालेल्या मॅरेथॉनमध्ये मुंबईसह जगभरातील धावपटूंनी भाग घेतला होता. काहींनी मराठी तर काहींनी भारतीय संस्कृतीचे दर्शन मॅरेथॉनमध्ये घडवले. काही धावपटूंनी सामाजिक संदेश दिला.

मुंबईः मुंबई मॅरेथॉनमध्ये ५५ वर्षीय नागरिकाचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या १३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील बहुतांश जण जखमी झाले आहेत. एकाला पायाला दुखापत झाली आहे तर दुसऱ्या धावपटूचा खांदा निखळला आहे. तर एकाच्या चेहऱ्याला मार लागला आहे, अशी माहिती मॅरेथॉनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय डिस्लिव्हा यांनी दिली.

रविवारी मुंबई मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. कोरोनामुळे मुंबई मॅरेथॉन झाली नव्हती. त्यामुळे रविवारी झालेल्या मॅरेथॉनमध्ये मुंबईसह जगभरातील धावपटूंनी भाग घेतला होता. काहींनी मराठी तर काहींनी भारतीय संस्कृतीचे दर्शन मॅरेथॉनमध्ये घडवले. काही धावपटूंनी सामाजिक संदेश दिला.

- Advertisement -

मुंबई मॅरेथॉनला ग्लॅमर आहे. राजकीय रंगही आहे. त्यामुळेच उद्योगपती, सेलिब्रेटी मुंबई मॅरेथॉनमध्ये पैसे देऊन सहभागी होतात. या मॅरेथॉनसाठी खास तयारीही केली जाते. मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंची विशेष काळजी घेतली जाते. धावताना कोणाला शारीरिक दुखापत झाली किंवा श्वसनाचा त्रास झाला तर वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक सदैव तयार असते. कोणत्या धावपटूला शारीरिक त्रास असेल तर त्याने मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ नये असा सल्लाही दिला जातो. रविवारी झालेल्या मॅरेथॉनमध्ये दुखापत व श्वसनाचा त्रास झालेल्या धावपटूंची तपासणी डॉक्टरांच्या पथकाने केली. तर ५५ वर्षीय धावपटूचे निधन झाल्याची घटना घडली.

‘टाटा मुंबई मॅरेथॉन 2023’ स्पर्धेत तब्बल ५५ हजार धावपटूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेत ठसा उमटवला तो इथिओपियाच्या पुरुष तसेच महिला धावपटूंनी. इथिओपियाच्या 14 मॅरेथॉनपटूंनी अव्वल दहामध्ये येण्याची किमया साधली. केनिया, मोरोक्को या आपल्या आफ्रिका बांधव, भगिनींना मागे टाकणार्‍या छोट्या चनीच्या इथिओपियन महिला धावपटूंनी 10 पैकी 9 जागा पटकावल्या. लेमीने 2 तास 7 मिनिटे 32 सेकंदात मॅरेथॉन जिंकताना केनियन रोनोपेक्षा 1 मिनिट 12 सेकंद कमी घेत अव्वल क्रमांक हासिल करताना 45 हजार डॉलर्स इनामाची कमाई केली.

- Advertisement -

एलीट, हौशी, अर्ध मॅरेथॉन, ड्रीम रन, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग,10 किलो मीटर रन अशा विविध 7 प्रकारच्या शर्यतीत. भारतीय पुरुष तसेच महिला धावपटूंनी आपली चमक दाखवली. यामध्ये लक्षवेधक कामगिरी केली ती गोपीने. त्याने अव्वल दहात दहावा क्रमांक मिळवताना वेळ दिली ती 2 तास 16 मिनिटे 41 सेकंदांची. त्याला दीड हजार डॉलर्सचे इनाम लाभले.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -