घरअर्थजगतShareChat मध्ये पुन्हा एकदा नोकर कपात, 600 कर्मचाऱ्यांना दिला नारळ

ShareChat मध्ये पुन्हा एकदा नोकर कपात, 600 कर्मचाऱ्यांना दिला नारळ

Subscribe

शेअरचॅट आणि मोज यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मालकी असलेल्या मोहल्ला टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आपले कर्मचारी 20 टक्क्यांनी कमी केले आहेत

नवी दिल्लीः भारतातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपनी असलेल्या ShareChat ने पुन्हा एकदा अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. शेअरचॅटची पालक कंपनी असलेल्या मोहल्ला टेक प्रायव्हेटने 25 कोटी डॉलरचा जवळपास निधी उभारल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत 600 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही 5 टक्के कर्मचार्‍यांना त्यांचे फॅन्टसी गेमिंग प्लॅटफॉर्म बंद करून काढून टाकण्यात आले होते. यावेळी सुमारे 600 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जे कर्मचारी अकार्यक्षम आणि बिनकामाचे आहेत, अशा कर्मचाऱ्यांचा कपातीत समावेश करण्यात आला आहे. भविष्यात आणखी कठोर निर्णय घेतले जाणार आहे, असंही कंपनीच्या सीईओने सांगितले आहे.

शेअरचॅट आणि मोज यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मालकी असलेल्या मोहल्ला टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आपले कर्मचारी 20 टक्क्यांनी कमी केले आहेत. याचा अर्थ कंपनीने 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ही कपात कोणत्या विभागात करण्यात आली हे अद्याप अस्पष्ट आहे. गेल्या महिन्यात देखील मोहल्ला टेकने फँटसी गेमिंग प्लॅटफॉर्म जीत 11 बंद करताना 100 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.

- Advertisement -

शेअरचॅटच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्हाला आमच्या इतिहासातील काही सर्वात कठीण आणि वेदनादायी निर्णय घ्यावे लागले आहेत आणि आमच्या प्रतिभावान कर्मचार्‍यांपैकी अंदाजे 20 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकावं लागलं आहे. कर्मचाऱ्यांच्या खर्चात कपात करण्याचा निर्णय अतिशय विचारपूर्वक घेण्यात आल्याचा उल्लेखही प्रवक्त्याने केला आहे.

सध्याच्या बाजाराकडे पाहता यंदा गुंतवणूक करताना खूप सावध राहावे लागेल. कंपनी लाइव्ह स्ट्रीमिंग आणि जाहिरातींच्या माध्यमातून कमाई दुप्पट करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच वेळी काढून टाकलेल्या कर्मचार्‍यांना त्यांच्या नोटिस कालावधीचा पूर्ण पगार, कंपनीशी संबंधित प्रत्येक वर्षासाठी दोन आठवड्यांचा पगार आणि डिसेंबर 2022 पर्यंत बदलत्या वेतनाचे 100% पैसे दिले जाणार आहेत. याशिवाय उर्वरित सुट्ट्यांच्या बदल्यात 45 दिवसांपर्यंतचा पगारही दिला जाईल.

- Advertisement -

2015 मध्ये कंपनी सुरुवात झाली
शेअरचॅट हे भारतातील सर्वात लोकप्रिय घरगुती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. भारतात त्याच्या मासिक सक्रिय वापरकर्त्यांची संख्या 40 कोटी आहे. 2015 मध्ये अंकुश सचदेवा, भानू प्रताप सिंह आणि फरीद अहसान यांनी मिळून ही कंपनी सुरू केली. शेअरचॅट व्यतिरिक्त कंपनी Moj प्लॅटफॉर्मदेखील चालवते, जे युजर्समध्ये खूप लोकप्रिय आहे.


हेही वाचाः India Post Recruitment 2023: इंडिया पोस्टमधील 98,083 रिक्त जागांसाठी भरती, 10वी पासनाही नोकरीची संधी

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -