घरक्रीडाशतकवीर पृथ्वीला मुंबई पोलिसांकडून अनोख्या शुभेच्छा

शतकवीर पृथ्वीला मुंबई पोलिसांकडून अनोख्या शुभेच्छा

Subscribe

भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉने आपल्या आंतराष्ट्रीय पदार्पणाच शतक झळकावले. त्याचे शतक पूर्ण झाल्यावर मुंबई पोलिसांनी त्याला अनोखे ट्विट करत शुभेच्छा दिल्या.

अनुभवी सलामीवीर शिखर धवन आणि मुरली विजय यांच्या इंग्लंडमधील  खराब कामगिरीनंतर भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत युवा पृथ्वी शॉला संधी देण्याचा निर्णय घेतला. पृथ्वीने त्याला मिळालेल्या या संधीचे सोने केले. त्याने आपल्या पदार्पणातच शतक झळकावले. त्याच्या या दमदार कामगिरीची दखल मुंबई पोलिसांनीही घेतली. त्यांनी अनोखे ट्विट करत पृथ्वीला त्याच्या शतकाबद्दल शुभेच्छा दिल्या.

१०० नेहमीच उपयुक्त 

मुंबईच्या पृथ्वी शॉने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या पहिल्या डावातच शतक केले. त्याने १५४ चेंडूंत १३४ धावा केल्या. या त्याच्या खेळीत १९ चौकारांचा समावेश होता. त्याने जसे आपले शतक पूर्ण केले तसे मुंबई पोलिसांनी त्याला शुभेच्छा देणार ट्विट केले. ज्यात त्यांनी लिहिले की १०० नेहमीच उपयुक्त असते. पोलिसांचा आपत्कालीन नंबर १०० आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी पृथ्वी शॉला शुभेच्छा देताना १०० नंबरची जनजागृती केली आहे.

इतरांकडूनही कौतुक

पृथ्वी शॉने केलेल्या शतकाचे कौतुक करणारे मुंबई पोलीस एकटे नव्हते. हरभजन सिंग आणि माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यानेही पृथ्वीचे कौतुक केले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -