घरक्रीडाNZ vs PAK : पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडची पाकिस्तानवर मात 

NZ vs PAK : पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडची पाकिस्तानवर मात 

Subscribe

न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

वेगवान गोलंदाज जेकब डफीने केलेल्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानवर ५ विकेट राखून मात केली. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या जेकब डफीने ४ षटकांत ३३ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट घेतल्या. डफीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या चौथ्याच चेंडूवर पहिली विकेट मिळवली. त्याने अब्दुल्लाह शफिकला माघारी पाठवले. तसेच त्याने मोहम्मद रिझवान, मोहम्मद हाफिज आणि कर्णधार शादाब खान यांच्याही विकेट घेतल्या.

या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार शादाब खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पाकिस्तानच्या डावाची खराब सुरुवात झाली. त्यांनी ३९ धावांतच ५ विकेट गमावल्या. यानंतर मात्र शादाब खान (३२ चेंडूत ४२) आणि फहीम अश्रफ (१८ चेंडूत ३१) यांनी चांगली फलंदाजी केली. त्यामुळे पाकिस्तानने २० षटकांत ९ बाद १५३ अशी धावसंख्या उभारली. १५४ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची २ बाद २१ अशी अवस्था झाली होती. परंतु, सलामीवीर टीम सायफर्ट (५७) आणि ग्लेन फिलिप्स (२३) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी रचत न्यूझीलंडचा डाव सावरला. हे दोघे बाद झाल्यावर मार्क चॅपमनने (३४) चांगला खेळ करत न्यूझीलंडला ७ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवून दिला.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -