घरक्रीडान्यूझीलंडची भारतावर १० गडी राखून मात

न्यूझीलंडची भारतावर १० गडी राखून मात

Subscribe

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाला अखेरीस आपल्या पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन कसोटी सामन्यात, यजमान संघाने भारतावर १० गडी राखून मात केली.

न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन कसोटी सामन्यात, न्यूझीलंड संघाने भारतावर १० गडी राखून मात केली. पहिल्या डावात सुमार कारगीरी करणाऱ्या भारताच्या फलंदाजांना दुसऱ्या डावातही निराशेचा सामना करावा लागला. दुसऱ्या डावात भारताला १९१ धावा करता आल्या. त्यामुळे न्युझीलंडसमोर अवघ्या ९ धावांचे आव्हान राहिले आणि ते न्युझीलंडने अगदी सहज गाठले. या सामन्यात गोलंदाजांचा भेदक मारा आणि त्यांना फलंदाजांनी दिलेली साथ हे न्यूझीलंडच्या विजयाचे वैशिष्ठ्य ठरले.

- Advertisement -

दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाज ढेपाळले

वेलिंग्टन कसोटी सामन्यात सलग दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांनी पुरती निराशा केली. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करल्यामुळे भारतीय संघ दुसऱ्या डावात फक्त १९१ धावांपर्यंत मजल मारु शकला. ज्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी अवघे ९ धावांचे आव्हान मिळाले. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारतीय संघ ३९ धावांनी पिछाडीवर होता. त्यामुळे चौथ्या दिवशी भारतीय फलंदाज संयमाने फलंदाजी करतील असा अंदाज होता, मात्र ट्रेंट बोल्टने अजिंक्य रहाणेला माघारी धाडत भारताला पहिला धक्का दिला.

पुन्हा निराशा-

पृथ्वी शॉ व मयांक अग्रवाल या सलामी जोडीने भारतासाठी दुसऱ्या डावात २७ धावांची आश्वासक सुरूवात करून दिली. पण ट्रेण्ट बोल्टच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉ १४ धावांवर टॉम लॅथमकरवी झेलबाद झाला आणि टीम इंडियाला पहिला धक्का बसला.त्यानंतर मयांक अग्रवाल व चेतेश्वर पुजारा ही जोडी स्थिरावणार असे वाटत असतानाच ट्रेण्ट बोल्टनेच चेतेश्वर पुजाराची विकेट घेतली. चेतेश्वर पुजाराने ८१ चेंडूंत फक्त ११ धावा केल्या. याच दरम्यान मयांक अग्रवालने एक षटकार व सात चौकारांसह ५८ धावांची खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण टीम साऊथीने त्याला झेलबाद केले. कर्णधार विराट कोहलीला या दौऱ्यात अद्याप सूर गवसलेला नाही. त्यानंतर ट्रेण्ट बोल्टने त्याला १९ धावांवर बीजे वॉटलिंगकरवी झेलबाद करीत भारताचा पाय खोलात नेला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -