घरक्रीडाविश्वचषकासाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा

विश्वचषकासाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा

Subscribe

आगामी विश्वचषकासाठी न्युझीलंडच्या संघाची घोषणा झाली आहे. केन विल्यमसनला या संघाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आहे.

आगामी विश्वचषकासाठी न्युझीलंडने आपला संघ जाहीर केला आहे. ३० मे २०१९ पासून विश्वचषक स्पर्धा सुरु होणार आहे. विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर करणारा न्युझीलंड या मोसमातील पहिला संघ ठरला आहे. न्युझीलंडच्या या संघात अनुभवी खेळाडूंना संधी दिली गेली आहे. या सर्व संघाचं नेतृत्त्व केन विल्यमसनकडे सोपविण्यात आलं आहे. विश्वचषकामध्ये न्युझीलंडचा पहिला सामना १ जून रोजी होणार आहे. न्युझीलंडचा हा पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.

न्युझीलंडच्या खेळाडूंचे नावे

केन विल्यमसन, मार्टिन गप्टील, हेन्री निकोलस, रॉस टेलर, टॉम लॅथम, कॉलिन मुनरो, टॉम ब्लंडेल, कॉलिन डी-ग्रॅंडहोम, मिचेल सँटनर, जिमी निशम, इन सोधी, मॅट हेन्नी, लॉकी फर्ग्युसन, टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -