घरमहाराष्ट्रतीन हजाराची लाच घेणाऱ्या लिपिकास ४ वर्षे सक्तमजुरी

तीन हजाराची लाच घेणाऱ्या लिपिकास ४ वर्षे सक्तमजुरी

Subscribe

अहमदनगर जिल्हा परिषदेत एका शिक्षकाचे पगारबिल देण्यासाठी लाच घेणाऱ्या लिपिकास अटक करण्यात आली असून ४ वर्षाची सक्तमजुरी देण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्हा परिषदेत एका शिक्षकाचे पगारबिल देण्यासाठी ३ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या वरिष्ठ लिपाकास अहमदनगरचे जिल्हा न्यायाधीश एन. एल. काळे यांनी ४ वर्षे सक्तमजुरी आणि ४ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. लाच घेताना लिपिकास रंगेहाथ पकडण्याची ही घटना ६ नोव्हेंबर रोजी घडली होती. पाश्र्वनाथ औटी असे सक्तमजुरीची शिक्षा झालेल्या वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. या प्रकरणी कर्जतच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक दत्तात्रय राऊत यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेतील वरिष्ठ लिपीक औटी हे शिक्षकांचे पगार काढण्यासाठी मुद्दाम विलंब करीत असत. पगारबिले काढण्यासाठी प्रत्येक महिन्याला १ हजार रूपये देण्याची ते शिक्षकांकडे मागणी करीत असत. कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दत्तात्रय राऊत यांच्याकडे औटी याने मागील दोन महिन्यांचे थकित पगाराचे बिल काढण्यासाठी ३ हजार रूपयांची मागणी केली होती. त्यानंतर राऊत यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ६ नोव्हेंबर रोजी सापळा लावून औटी याला शिक्षक राऊत यांच्याकडून ३ हजाराची लाच घेतांना रंगे हाथ पकडले होते. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

- Advertisement -

याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश एन.एल.काळे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली असून सरकारच्या वतीने अनिल सरोदे यांनी काम पाहिले आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेला पुरावा, साक्षीदारांनी दिलेली माहिती आणि सरकारी वकीलांचा युक्तीवाद याच्या आधारे न्यायालयाने लाचखोर लिपिक पाश्र्वनाथ औटी यास ४ वर्षे सक्तमजुरी आणि ४ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निकालाने जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -