घरक्रीडापाकिस्तानचा कर्णधार सर्फराजची फेहलुकवायोवर वर्णभेदी टिपण्णी

पाकिस्तानचा कर्णधार सर्फराजची फेहलुकवायोवर वर्णभेदी टिपण्णी

Subscribe

पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार सर्फराज अहमद दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू अँडिले फेहलुकवायोवर वर्णभेदी टिप्पणी केल्यामुळे अडचणीत सापडला आहे. मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात सर्फराजने फेहलुकवायोचा ’काळा’ असा उल्लेख केला.

दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात फेहलुकवायोच्या ४ विकेटमुळे पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करताना २०३ धावाच करता आल्या. तर २०४ धावांचा पाठलाग करताना द. आफ्रिकेची अवस्था ५ बाद ८० अशी झाली होती. पण यानंतर वॅन डर डूसन आणि फेहलुकवायो या दोघांनी झुंजार खेळी करत द. आफ्रिकेला सामना जिंकवून दिला. डूसनने नाबाद ८० धावांची खेळी केली. तर त्याला फेहलुकवायोने ६९ धावा करत चांगली साथ दिली. फेहलुकवायो फलंदाजी करत असताना एक चेंडू यष्टींजवळून गेला, मात्र तो बाद झाला नाही. त्यामुळे सर्फराजचा तोल सुटला आणि त्याने फेहलुकवायोवर वर्णभेदी टिप्पणी केली. यष्टींमागून सर्फराज म्हणाला, अबे काले, तेरी अम्मी आज कहा बैठी है? क्या पढवा के आया है आज? (अरे काळ्या, तुझ्या आईला तू कुठे बसवून आला आहेस? आईला आज काय प्रार्थना करायला सांगितली आहेस?)

- Advertisement -

या प्रकरणामुळे सर्फराजवर सोशल मीडियावरून जोरदार टीका होत आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने सर्फराजने या टिपण्णीचे स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली आहे. मात्र सामना अधिकारी किंवा आयसीसीने अजून याची दखल घेतलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -