घरमुंबईवृत्तपत्र विक्रेत्यांचे पुस्तक प्रदर्शन

वृत्तपत्र विक्रेत्यांचे पुस्तक प्रदर्शन

Subscribe

मुंबई-ठाण्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची संघटना ‘बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ’ मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपले योगदान देण्यास पूर्ण तयारीनिशी कामाला लागली. मराठी वाचन संस्कृती जिवंत राहावी,वाढावी आणि खोलवर रुजावी या प्रामाणिक हेतुने भरविलेले हे पुस्तक प्रदर्शन सर्वार्थाने यशस्वी झाले. अजब प्रकाशन या संस्थेने उत्तम आणि दर्जेदार पुस्तकांचा वैविध्यपूर्ण खजिना फक्त ७० रुपये प्रती पुस्तक ह्या अत्यल्प दरात उपलब्ध करून दिला. दोन पुस्तकांवर एक पुस्तक मोफत असे प्रोत्साहनही वाचकांस खरेदीसाठी अजब प्रकाशाकडून देण्यात आले.सर्वात महत्वाचा असणारा जागेचा प्रश्न बंड्या मारुती सेवा मंडळाने चुटकीसरशी सोडविला.पुस्तक प्रदर्शनास जागा उपलब्ध करून देण्यासाठी ते पुस्तक प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सर्व प्रकारचे साहाय्य या मंडळाने दिले. प्रदर्शनात आध्यात्मिक योग विषयक,कथा, कांदबरी,व्यक्तीमत्व विकास, वेळेचे व्यवस्थापन,ऐतिहासिक, थोरा मोठ्यांची चरित्र, कायदेविषयक, आरोग्य विषयक, पर्यटन विषयक, भविष्य, शेती विषयक, शैक्षणिक, व्याकरण विषयक, पाककृती, लहान मुलांच्या गोष्टी,गड-किल्ले या व अशा अनेक विषयावरच्या विविधांगी पुस्तकांची रेलचेल होती.

सर्वसामान्य नागरिकांना ७० रुपये मुल्य असल्यामुळे ८ ते १० पुस्तक विकत घेणे,सहज परवडत होते. महिला, शाळा व महाविद्यालयीन मुले तसेच जेष्ठ नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती. ६ ते २१ जानेवारी असे १५ दिवस चाललेल्या प्रदर्शनास लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,ना.म.जोशी सार्वजनिक उत्सव मंडळ, चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली आणि पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ या नामांकित मंडळांच्या प्रमुखांनी व सदस्यांनी भेट देऊन हजारो रुपयांची पुस्तक खरेदी केली. गिरणी कामगार बहूल परिसरातील वाचनालये, शाळा, महाविद्यालये, खाजगी क्लासेस यांनी ह्या पुस्तक प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद दिला. समाज मित्र मुंबई पोलिस यांनीसुद्धा ह्या प्रदर्शनास भेट दिली.

- Advertisement -

जीवन भोसले यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे प्रदर्शन भविष्यात वर्तमानपत्रांच्या विक्रीसही पूरक ठरेल असे मत लेखकांनी व्यक्त केले. प्रदर्शन यशस्वी करण्यास उपशाखाप्रमुक श्री शंकर रिंगे विभागातील वृत्तपत्र विक्रेते श्री अमोल खामकर, गणेश खेनट, राजेंद्र चव्हाण, धनंजय वायाळ, प्रदिप सातार्डेकर, गणेश लब्दे , मोहन शिंगोटे व विभागातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी मेहनत घेतली. प्रदर्शनाच्या समारोप सोहळ्यात बृहन्मुंबई वृत्तपत्र संघाचे कार्याध्यक्ष संजय चौकेकर, बंड्या मारुती सेवा मंडळाचे सरचिटणीस राहूल जाधव, शिवशाहू प्रतिष्ठान अध्यक्ष रविंद्र देसाई, सचिव कृष्णा पाटील, अजब प्रकाशनचे मनोज साळुंखे, ज्येष्ठ गिरणी कामगार विठोबा भोसले, ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते अजित सहस्रबुद्धे, प्रकाश कानडे, सुशातं वेगुर्लेकर व बाळकृष्ण चव्हाण उपस्थित होते..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -