घरक्रीडाT20 World Cup 2021: पाकिस्तान संघात धोनीचा फॅन, म्हणाला आप धोनी..., व्हिडिओ...

T20 World Cup 2021: पाकिस्तान संघात धोनीचा फॅन, म्हणाला आप धोनी…, व्हिडिओ व्हायरल  

Subscribe
भारत विरूध्द पाकिस्तानच्या सामना आता अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. सामन्याच्या निमित्ताने दोन्ही संघातील डगाऊटच्या हालचालींनाही मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. अशातच प्रॅक्टीस सेशनमधून एक महेंद्र सिंह धोनीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पाकिस्तान संघाचा सराव ज्याठिकाणी सुरू होता त्याठिकाणाहून भारतीय संघाचा मेंटॉर महेंद्र सिंह धोनी जातानाचा हा व्हिडिओ आहे. पाकिस्तान संघाच्या सरावाच्या ठिकाणी धोनीने फेरफटका मारतानाचा हा व्हिडिओ आहे. त्यावेळी धोनीला पाहताच पाकिस्तान संघाचा युवा गोलंदाज धोनीला भेटण्यासाठी उत्सुक असल्याचे पहायला मिळाले.
भारतीय संघाचा सराव संपल्यानंतर धोनी मैदानावरून हॉटेलकडे निघाला होता. त्याच मैदानात पाकिस्तानी संघ सराव करत होता. धोनी पाकिस्तानच्या सरावाच्या ठिकाणी गेला नव्हता. पण धोनीला पाहून पाकिस्तानचा युवा गोलंदाज भारावून गेला. धोनीशी बोलण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. पाकिस्तानचा एक युवा गोलंदाज धोनीला जवळून बघताच त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. धोनीला भेटण्यासाठी आणि त्याच्याशी बोलण्यासाठी तो प्रयत्न करताना दिसला.

आप धोनी मै दहानी 

पाकिस्तानच्या सरावादरम्यान संघाचा युवा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानी बाउंड्री लाइनवर फिल्डींग करत होता. तेवढ्यात तेथून धोनीला जाताना त्याने पाहिले असता तो धोनीला मोठ्यानो आवाज देऊ लागला. पहिल्यांदा धोनीचे त्याच्याकडे लक्ष गेले नाही. नंतर जेव्हा धोनीने तो बोलण्यासाठी खूपच उत्सुक असल्याचे पाहिले, तेव्हा त्याला धोनीने थम्सअप केले. अशातच पाकिस्तानच्या गोलंदाजाने धोनीला आपली माहिती देखील दिली, ” तुम्ही धोनी आहात आणि मी दहानी आहे ” अशा हटक्या पध्दतीने त्याने त्याचा परिचय सांगितला.

कोण आहे शाहनवाज दहानी ? 

शाहनवाज दहानी २३ वर्षीय युवा गोलंदाज आहे, त्याचा अजून पाकिस्तानच्या संघात डेब्यू झाला नाही. त्याने डॉमेस्टिक टी ट्वेंटी मध्ये १८ सामन्यांत २९ बळी घेतले आहेत. लिस्ट ए क्रिकेट मध्ये त्याच्या नावावर ६ सामन्यांत ५ बळींची नोंद आहे. पाकिस्तान सुपर लीग मध्ये दहानी हा मुल्तान सुल्तान्स या संघाचा हिस्सा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -