घरक्रीडाIND vs AUS : लोक माझ्याविषयी 'हे' बोलत असल्याचे पाहून हसायला आले -...

IND vs AUS : लोक माझ्याविषयी ‘हे’ बोलत असल्याचे पाहून हसायला आले – स्मिथ  

Subscribe

पहिल्या दोन कसोटीत लवकर बाद झाल्यानंतर या सामन्यात शतक केल्याचा स्मिथला आनंद होता. 

ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टिव्ह स्मिथबाबत मागील काही दिवस बरीच चर्चा सुरु होती. भरवशाच्या स्मिथला भारताविरुद्ध पहिल्या दोन कसोटीत चांगली कामगिरी करण्यात अपयश आले होते. दोन कसोटींच्या चार डावांत मिळून स्मिथला केवळ १० धावा करता आल्या होत्या. तिसऱ्या कसोटीत मात्र स्मिथने उत्कृष्ट फलंदाजी करत १३१ धावांची खेळी केली. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील २७ वे शतक ठरले. पहिल्या दोन कसोटीत लवकर बाद झाल्यानंतर या सामन्यात शतक केल्याचा स्मिथला आनंद होता.

मी बऱ्याच गोष्टी वाचत होतो. माझ्याविषयी खूप चर्चा सुरु होती. मी फॉर्मात नसल्याचे अनेक लोक बोलत होते. मात्र, सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरच तीन-चार आठवड्यांपूर्वी मी सलग दोन शतके केली होती. त्यामुळे मी फॉर्मात नसल्याचे लोक बोलत आहेत, हे ऐकून मला हसायला येत होते. मला पहिल्या दोन कसोटीत मोठ्या धावा करता आल्या नाहीत हे खरे असले तरी मला फार चिंता नव्हती. आता या कसोटीत धावा केल्याचा आणि लोकांच्या म्हणण्यानुसार पुन्हा फॉर्मात आल्याचा आनंद आहे, असे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्मिथ म्हणाला. स्मिथचे हे ऑस्ट्रेलियात तीन वर्षांत पहिलेच कसोटी शतक होते.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -