घरक्रीडाUefa Champions League : रोनाल्डोचा ज्युव्हेंटस संघ स्पर्धेतून आऊट 

Uefa Champions League : रोनाल्डोचा ज्युव्हेंटस संघ स्पर्धेतून आऊट 

Subscribe

पोर्टोने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर जास्त गोल मारल्याने त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

क्रिस्तिआनो रोनाल्डोच्या ज्युव्हेंटस संघावर युएफा चॅम्पियन्स लीग स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुष्की ओढवली आहे. घरच्या मैदानावर झालेल्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या लेगमध्ये ज्युव्हेंटसने पोर्तुगीज संघ पोर्टोला ३-२ असे पराभूत केले. या लढतीत दोन लेगनंतर ४-४ अशी बरोबरी होती. परंतु, पोर्टोने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर जास्त गोल मारल्याने त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आणि ज्युव्हेंटसला स्पर्धेबाहेर व्हावे लागले. दुसरीकडे डॉर्टमंड आणि सेव्हिया यांच्यात दुसऱ्या लेगचा सामना २-२ असा बरोबरीत संपला. मात्र, डॉर्टमंडने दोन लेगमध्ये मिळून ही लढत ५-४ अशी जिंकत स्पर्धेत आगेकूच केली.

फेडेरिको किएसाचे दोन गोल

उप-उपांत्यपूर्व फेरीतील लढतीच्या पहिल्या लेगमध्ये पोर्टोने ज्युव्हेंटसचा २-१ असा पराभव केला होता. दुसऱ्या लेगमध्येही पोर्टोने आक्रमक सुरुवात केली. १९ व्या मिनिटाला त्यांना पेनल्टी मिळाली, ज्यावर सर्जिओ ऑलिव्हेराने गोल करत पोर्टोला दुसऱ्या लेगमध्ये १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, उत्तरार्धात फेडेरिको किएसाने दोन गोल केल्याने ज्युव्हेंटसला २-१ अशी आघाडी मिळाली आणि एकूण लढतीत ३-३ अशी बरोबरी झाली.

- Advertisement -

प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर जास्त गोल

त्यानंतर झालेल्या ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत ऑलिव्हेराने आपला आणि पोर्टोचा दुसरा गोल केला. तर ११७ व्या मिनिटाला रॅबियोने केलेल्या गोलमुळे ज्युव्हेंटसने दुसरा लेग ३-२ असा जिंकला. या लढतीत दोन लेगनंतर ४-४ अशी बरोबरी होती. परंतु, प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर जास्त गोल मारल्याने पोर्टोने स्पर्धेत आगेकूच केली.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -