घरक्रीडाहैदराबादने सिंधूसाठी मोजले ७७ लाख रुपये!

हैदराबादने सिंधूसाठी मोजले ७७ लाख रुपये!

Subscribe

प्रीमियर बॅडमिंटन लीग

विश्व विजेत्या पी. व्ही. सिंधूला हैदराबाद हंटर्सने प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) पुढील मोसमासाठी आपल्या संघात कायम ठेवले आहे. मंगळवारी झालेल्या या स्पर्धेच्या खेळाडू लिलावात हैदराबादने ७७ लाख रुपये इतकी रक्कम देत सिंधूला आपल्या संघात घेतले. तसेच महिलांमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणार्‍या चिनी तैपेईच्या ताई झू यिंगला गतविजेत्या बंगळुरू रॅप्टर्सने ७७ लाख रुपयांतच खरेदी केले.

जागतिक स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणार्‍या साई प्रणितलाही बंगळुरू रॅप्टर्सने आपल्या संघात कायम ठेवले. त्याच्यावर बंगळुरूने ३२ लाख रुपयांची बोली लावली. त्याचप्रमाणे सुमित रेड्डी (११ लाख रुपयांत चेन्नई सुपरस्टार्स) आणि चिराग शेट्टी (१५ लाख रुपयांत पुणे ७ असेस) हेसुद्धा मागील मोसमातील संघांकडूनच पाचव्या मोसमात खेळताना दिसतील.

- Advertisement -

राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची मुलगी गायत्री गोपीचंदला चेन्नई सुपरस्टार्सने खरेदी केले. तसेच आसामची युवा खेळाडू अस्मिता चलिहा नॉर्थ इस्टर्न वॉरियर्सने ३ लाख रुपये मोजत आपल्या संघाचा भाग बनवले. जानेवारी २० ते फेब्रुवारी ९ या कालावधीत पार पडणार्‍या पीबीएलच्या पाचव्या मोसमात भारताचे आघाडीचे खेळाडू सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत हे खेळणार नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -