घरक्रीडाThailand Open : सिंधूचे आव्हान संपुष्टात; सात्विक-अश्विनीचा उपांत्य फेरीत प्रवेश

Thailand Open : सिंधूचे आव्हान संपुष्टात; सात्विक-अश्विनीचा उपांत्य फेरीत प्रवेश

Subscribe

समीर वर्माही उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला. 

भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि समीर वर्मा यांचे थायलंड ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिंधूला थायलंडच्या चौथ्या सीडेड रॅटचनॉक इंटानोनने १३-२१, ९-२१ असे पराभूत केले. सिंधूला या सामन्यात इंटानोनला फारशी झुंज देता आली नाही. पहिल्या गेमच्या मध्यंतराला इंटानोनकडे ११-७ अशी आघाडी होती. यानंतर सिंधूने या गेममध्ये १३-१३ अशी बरोबरी केली. परंतु, इंटानोनने दमदार पुनरागमन करत हा गेम २१-१३ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने निराशाजनक खेळ केला. त्यामुळे इंटानोनने हा गेम २१-९ असा जिंकत स्पर्धेत आगेकूच केली.

- Advertisement -

अँटोनसेनची समीरवर मात

पुरुष एकेरीत समीर वर्मावर अँडर्स अँटोनसेनने २१-१३, १९-२१, २२-२० अशी मात केली. दोन गेमनंतर या सामन्यात १-१ अशी बरोबरी होती. तर तिसऱ्या गेममध्ये समीरकडे २०-१९ अशी आघाडी होती. मात्र, यानंतर अँटोनसेनने तीन पैकी दोन गुण मिळवत हा गेम २२-२० असा जिंकला. त्यामुळे समीरला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले.

- Advertisement -

सात्विक-अश्विनीची आगेकूच

मिश्र दुहेरीत सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि अश्विनी पोनप्पाने मलेशियाच्या चॅन पेंग सून आणि गोह लियू यिंगवर १८-२१, २४-२२, २२-२० अशी मात केली. या सामन्यातील अखेरचे दोन गेम चुरशीचे झाले. मात्र, सात्विक आणि अश्विनीने योग्य वेळी त्यांचा खेळ उंचावत हा सामना जिंकला. त्यामुळे सात्विक आणि अश्विनी या जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश केला.


हेही वाचा – टीम इंडियाच्या यशात ‘या’ तिघांची भूमिका महत्वाची


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -