घरक्रीडाNCA अध्यक्षपदासाठी द्रविडचा पुन्हा अर्ज; बीसीसीआयने अंतिम तारीख वाढवली

NCA अध्यक्षपदासाठी द्रविडचा पुन्हा अर्ज; बीसीसीआयने अंतिम तारीख वाढवली

Subscribe

या पदासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख १५ ऑगस्ट होती.

भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (NCA) अध्यक्षपदासाठी पुन्हा नव्याने अर्ज केला आहे. एनसीएचा अध्यक्ष म्हणून द्रविडचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या पदासाठी नव्याने अर्ज मागवले होते. बीसीसीआयच्या नव्या संविधानानुसार, एनसीए अध्यक्षाचा कार्यकाळ वाढवण्याची परवानगी नसून या पदासाठी नव्याने अर्ज मागवावे लागतात. त्यामुळे बीसीसीआयने ही प्रक्रिया सुरु केली होती. परंतु, या प्रक्रियेला फारसा प्रतिसाद न लाभल्याने बीसीसीआयने अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख वाढवली आहे.

द्रविडच्या अध्यक्षतेत एनसीएचा कायापालट

राहुल द्रविडने एनसीएच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा अर्ज केला आहे. त्याच्या अध्यक्षतेत एनसीएचा कायापालट झाला असून त्याला त्याचे चांगले काम सुरु ठेवायचे आहे. आतापर्यंत द्रविड वगळता इतर कोणत्याही नावाजलेल्या व्यक्तीने या पदासाठी अर्ज केलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले. या पदासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख १५ ऑगस्ट होती. परंतु, ही तारीख आणखी काही दिवसांनी वाढवण्यात आली आहे. द्रविडचीच पुन्हा या पदावर नियुक्ती होणार असे वाटत असल्याने इतर कोणी अर्ज केलेले नाहीत. परंतु, अर्ज करणाऱ्या व्यक्तींना नक्कीच त्यांचे मत मांडण्याची संधी देण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

- Advertisement -

प्रशिक्षकपदाच्या शर्यतीतून आऊट?

भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री आगामी टी-२० वर्ल्डकपनंतर त्यांचे पद सोडणार असल्याची चर्चा होती. त्यांची जागा घेण्यासाठी द्रविडला प्रमुख दावेदार मानले जात होते. परंतु, द्रविड आता एनसीएच्या अध्यक्षपदी कायम राहण्यास उत्सुक असल्याने त्याची प्रशिक्षकपदी निवड करणे अशक्यच झाले आहे. द्रविडच्या मार्गदर्शनात मागील महिन्यात भारताने एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेला पराभूत केले होते.


हेही वाचा – सिबले आऊट, मलान इन; तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -