घरक्रीडापुरुषांत जय हनुमान चरी, महिलांत कर्नाळाला जेतेपद

पुरुषांत जय हनुमान चरी, महिलांत कर्नाळाला जेतेपद

Subscribe

रायगड निवड चाचणी कबड्डी

रायगड जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पुरुष गटात जय हनुमान क्रीडा मंडळ चरी संघाने जेतेपद पटाकवले, तर म्हसोबा क्रीडा मंडळ पेझारी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिलांच्या अंतिम सामन्यात कर्नाळा स्पोर्ट्स क्लबने राजमाता स्पोर्ट्स क्लबवर मात करत अजिंक्यपद मिळवले.

जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने उरण तालुक्यातील बोकडवीरा येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पुरुष गटातील जय हनुमान चरी आणि म्हसोबा पेझारी यांच्यातील अंतिम सामना अटीतटीचा झाला. पूर्वार्धात १० गुणांनी पिछाडीवर पडलेल्या जय हनुमानने ही पिछाडी भरून काढून सामना २०-१८ असा अवघ्या २ गुणांनी जिंकला. महिलांच्या अंतिम सामन्यात कर्नाळा स्पोर्ट्स क्लबने कळंबोलीच्या राजमाता स्पोर्ट्स क्लबचा ३१-२९ असा पराभव केला.

- Advertisement -

या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे रायगड जिल्ह्याचे पुरुष आणि महिला संघ निवडण्यात आले आहेत. हे संघ राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत रायगडचे प्रतिनिधित्व करतील. ही स्पर्धा १९ ते २२ डिसेंबर या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -