घरक्रीडाRanji Trophy 2022 : मुंबई नॉकआऊटमध्ये तरी कर्णधार पृथ्वी शॉ नाखूश, फलंदाजीने...

Ranji Trophy 2022 : मुंबई नॉकआऊटमध्ये तरी कर्णधार पृथ्वी शॉ नाखूश, फलंदाजीने केलं निराश

Subscribe

2015-16 पासून मुंबईने एकही हंगाम जिंकलेला नाही. मुंबईचा संघ ड गटात होता आणि संघाने साखळी टप्प्यातील तीनपैकी दोन सामने जिंकले आणि एक सामना अनिर्णित राहिला. शेवटच्या साखळी सामन्यात ओडिशाचा पराभव केल्यानंतर मुंबईने पुढच्या टप्प्यात आपले स्थान पक्के केले. शॉ आपल्या संघाच्या यशाने खूश आहे, पण त्याच्या कामगिरीवर तो खूश नाही.

नवी दिल्लीः भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉकडे यंदाच्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई संघाचे नेतृत्व सोपवण्यात आलेय. अजिंक्य रहाणेच्या (रणजी करंडक) उपस्थितीतही व्यवस्थापनाने पृथ्वीवर विश्वास दाखवला होता. शॉने आपले कर्णधारपद सिद्ध केले आणि संघाला पात्रता मिळवून दिली आणि पुढील फेरीत प्रवेश केला. मात्र, शॉ फलंदाज म्हणून फ्लॉप ठरला. त्याने बॅटने काहीही आश्चर्यकारक केले नाही. 2015-16 पासून मुंबईने एकही हंगाम जिंकलेला नाही. मुंबईचा संघ ड गटात होता आणि संघाने साखळी टप्प्यातील तीनपैकी दोन सामने जिंकले आणि एक सामना अनिर्णित राहिला. शेवटच्या साखळी सामन्यात ओडिशाचा पराभव केल्यानंतर मुंबईने पुढच्या टप्प्यात आपले स्थान पक्के केले. शॉ आपल्या संघाच्या यशाने खूश आहे, पण त्याच्या कामगिरीवर तो खूश नाही.

पृथ्वी शॉ त्याच्या फलंदाजीवर नाखूश

शॉ स्पोर्टस्टारला म्हणाला, ‘याचा अर्थ सरळ आहे. साखळी टप्प्यात आमचे फक्त तीन सामने झाले, त्यामुळे आम्ही बाद फेरीचा फारसा विचार करू शकलो नाही. काहीही झाले तरी आम्ही बाद फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी खेळत होतो. मी सर्वांना उपस्थित राहून प्रत्येक सत्राचा आनंद लुटण्यास सांगितले.’ शॉ त्याच्या फलंदाजीवर खूश नाही आणि त्याला वाटते की, तो आणखी चांगली कामगिरी करू शकतो. तीन सामन्यांच्या सहा डावांत त्याच्या बॅटमधून फक्त एकच अर्धशतक झळकावता आले. तो म्हणाला, ‘मी माझ्या कामगिरीवर खूश नाही, ती अधिक चांगले व्हायला हवे होते. तुम्हाला माहीत आहे की, 40 आणि 50 चा स्कोअर क्रिकेटमध्ये काहीच नाही. पण मला वाटतं ते ठीक आहे. मी चांगली फलंदाजी करत आहे आणि मला वाटते की, मी लवकरच मोठी खेळी करेन.

- Advertisement -

रहाणेच्या जागी शॉला कर्णधार बनवण्यात आले

पृथ्वी शॉला संघाचा कर्णधार बनवण्याच्या निर्णयाने चाहते आश्चर्यचकित झाले. शॉला कर्णधार बनवण्यामागील कारण स्पष्ट करताना एमसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “जेव्हा डिसेंबरमध्ये संघाची निवड झाली, तेव्हा रहाणेच्या उपलब्धतेबाबत परिस्थिती स्पष्ट नव्हती. रहाणे त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत होता आणि 13 जानेवारीपासून ही स्पर्धा सुरू होणार होती, पण कोविडमुळे ती पुढे ढकलण्यात आली. आता रहाणे उपस्थित आहे आणि त्यामुळे मुंबई क्रिकेटच्या थिंक टँकने सर्व संबंधितांशी बोलून शॉला कर्णधारपदी कायम ठेवणेच संघाच्या हिताचे ठरेल, असा निर्णय घेतला. शॉच्या नेतृत्वाखाली मुंबईने गेल्या वर्षी विजय हजारे ट्रॉफी जिंकली होती.


हेही वाचाः ठाकरे सरकार शेतकरी विरोधी सुल्तानी वसुली सरकार, देवेंद्र फडणवीसांचा वीज कापणीवरून घणाघात

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -