घरताज्या घडामोडीSanjay Raut : संजय राऊत मंगळवारी पत्रकार परिषद घेणार, कोणावर डागणार टीकेची...

Sanjay Raut : संजय राऊत मंगळवारी पत्रकार परिषद घेणार, कोणावर डागणार टीकेची तोफ?

Subscribe

किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्यांचा पालघर, वसईमध्ये अनधिकृत कामे असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता.

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा आपली पत्रकार परिषद आयोजित केली आहे. शिवसेना भवनात ही पत्रकार परिषद होणार आहे. दरम्यान गेल्या वेळी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर टीकास्त्र डागलं होतं. तसेच सोमय्या बाप-बेटे जेलमध्ये जाणार असा इशारा सुद्धा संजय राऊत यांनी दिला होता. यामुळे उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये राऊत ईडी आणि किरीट सोमय्या यांच्यावर काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. किरीट सोमय्या यांच्यासोबत संजय राऊतांच्या टार्गेटवर कोण कोण आहे? हे पत्रकार परिषद पाहिल्यावरच कळेल.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती दिली आहे. मी उद्या दुपारी ४ वाजता शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेणार आहे. असे ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. यापूर्वी संजय राऊत यांनी १५ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेतली होती. केंद्रीय तपास यंत्रणा, ईडी आणि भाजप नेत्यांवर टीका केली होती.

- Advertisement -

केंद्रीय यंत्रणा भाजपच्या सल्ल्यानुसार काम करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. माजी खासदार किरीट सोमय्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करत होते. किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांचे पालघर, वसईमध्ये अनधिकृत कामे असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यात अनेक घडामो़डी घडल्या आहे. यामध्ये अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. ईडीचे राज्यातील नेत्यांच्या संबंधित लोकांवर छापेमारी सुरु आहे. यावर संजय राऊत उद्या नेमकं काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : OBC आरक्षणाच्या नव्या विधेयकामुळे राज्य सरकारचा काऊंट डाऊन सुरु, फडणवीसांचा हल्ल्लाबोल

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -