घरताज्या घडामोडीठाकरे सरकार शेतकरी विरोधी सुल्तानी वसुली सरकार, देवेंद्र फडणवीसांचा वीज कापणीवरून घणाघात

ठाकरे सरकार शेतकरी विरोधी सुल्तानी वसुली सरकार, देवेंद्र फडणवीसांचा वीज कापणीवरून घणाघात

Subscribe

उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला कोणतीच किंमत नाही. ऊर्जा मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. या पवित्र सभागृहाचा अपमान करत वीज कनेक्शन कापणे सर्रास सुरु आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घेरण्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केला. परंतु राज्य सरकारने पळपुटेपणा केला असल्याचा घणाघात फडणवीस यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार शेतकरी विरोधी सुल्तानी वसूली सरकार असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये स्वारस्य नाही परंतु मद्यपींसाठी सूट देत आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सत्ताधाऱ्यांवर घणाघात केल्यानंतर विधिमंडळाच्या बाहेर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीसांनी राज्य सरकार सुल्तानी वसूली सरकार असल्याचा आरोप केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सुरज जाधव या तरुण शेतकऱ्याने फेसबुक लाईव्ह करुन, मला जगण्यामध्ये स्वारस्य नाही करण सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याचे विजेचे कनेक्शन कापण्यात आले. ही गंभीर बाब संभागृहात उपस्थित केली. तो एकटा नाही तर कोट्यावधी शेतकऱ्यांची भावना सुरजच्या बलिदानातून सुरजच्या माध्यमातून समोर आली आहे.

- Advertisement -

राज्य सरकार बेवड्यांसाठी योजना करु शकते

संवेदनशीलता दाखवत सरकारने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणं बंद करावे ही मागणी लावून धरली परंतु सरकार संवेदनशील आहे, मुंबईच्या बिल्डरांना कोट्यावधी रुपयांची सूट देऊ शकते. प्रिमियमध्ये सूट देऊ शकते.हे दारु विक्रेत्यांना एक्साईज मध्ये सूट देऊ शकते. बेवड्यांसाठी योजना करु शकते परंतु शेतकऱ्यांनी विनंती केली की, सातत्याने नापीक आहे त्यामुळे विजेच्या बिलाची थकबाकी आहे वीजेचे कनेक्शन कापू नका तरीही सरसकट वीज तोडणी सुरु आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला उर्जा मंत्र्यांकडून वाटण्याच्या अक्षता

आम्ही निदर्शनास आणून दिले की, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी दोन वेळा सभागृहात आश्वासन दिलं की, आम्ही वीज कनेक्शन कापणार नाही. शेवटचं आश्वासन असं होतं की, ५०० सातशे रुपये भरले तरी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणार नाही. परंतु उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला कोणतीच किंमत नाही. ऊर्जा मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. या पवित्र सभागृहाचा अपमान करत वीज कनेक्शन कापणे सर्रास सुरु आहे. दुसरीकडे एका डीपीवरच्या ६ शेतकऱ्यांनी बील भरलं असलं आणि दोन शेतकर्यांनी भरले नसेल तर संपूर्ण डीपी काढण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हातातोंडाशी आलेली पीकं, फळबागा अडचणीत येत आहेत. रब्बीनंतर आता खरिपाचा हंगाम खराब होणार अशी शक्यता आहे. शेतकऱ्यांमध्ये असंतोष सुरु आहे. यामुळे हाच असंतोष मांडण्याचा प्रयत्न करत होतो. खरं म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदारदेखील सांगत होते की, वीज कनेक्शन बंद करा परंतु त्यांची मुस्कटदाबी करण्यात आली. आम्ही प्रश्न उपस्थित केला तर आम्हाला दाबण्यात आले आहे. आज सरकारने कामकाज आटपून पळ काढला आहे. शेतकरी मात्र वाऱ्यावर आहे.

- Advertisement -

आस्मानी संकटापेक्षा सुल्तानी संकट मोठ

एक सुरज जाधव देवाघरी गेला इतर शेतकऱ्यांना विनंती आहे. टोकाचे पाऊल उचलू नका, आम्ही तुमच्यासाठी संघर्ष करु आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हे शेतकरी विरोधी सरकार आहे. या सरकारमध्ये केवळ वसुली आहे. सुल्तानी वसूली आहे. आस्मानी संकटापेक्षा सुल्तानी संकट मोठ आहे. त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत. जोपर्यंत वीज जोडणी बंद होत नाही तोपर्यंत संघर्ष सातत्याने सुरु राहील या शेतकरी विरोधी ठाकरे सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : ओबीसी आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर, मध्य प्रदेशच्या धर्तीवर कायदा येणार

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -