घरक्रीडाWTC FINAL 2023 : भारतीय फलंदाजांची खराब सुरुवात; 151 धावांवर गमावल्या 5...

WTC FINAL 2023 : भारतीय फलंदाजांची खराब सुरुवात; 151 धावांवर गमावल्या 5 विकेट्स

Subscribe

नवी दिल्ली : लंडनमधील ओव्हल येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (WTC Final 2023) अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पहिल्या डावात 5 विकेट गमावत 151 धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणे (29) आणि केएस भरत (5) धावांवर नाबाद आहेत. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारत तिसऱ्या दिवशी कसा खेळ करेल हे पाहावे लागेल.

ऑस्ट्रेलिया सर्वबाद झाल्यानंतर भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 15 धावा करून पॅट कमिन्सचा बळी ठरला. त्याचवेळी बोलंडने शुभमन गिलला (13) क्लीन बोल्ड करून भारताला दुसरा धक्का दिला. चेतेश्वर पुजारा आणि कोहली प्रत्येकी 14-14 धावा करून बाद झाले. यानंतर अजिंक्य रहाणे आणि जडेजा यांनी 100 चेंडूत 71 धावांची भागीदारी केली. जडेजाने वेगवान खेळ करताना 51 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 48 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून पाच गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. (WTC FINAL 2023 : Bad start for Indian batsmen; 5 wickets lost for 151 runs)

- Advertisement -

स्मिथने कसोटी कारकिर्दीतील 31वे शतक पूर्ण केले
याआधी ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी 327 धावांवर आपल्या 3 विकेट गमावल्या होत्या. ट्रॅव्हिस हेड (146) आणि स्टीव्ह स्मिथ (95) यांनी चांगली खेळी केली. दुसऱ्या दिवशी हेड आणि स्मिथ यांच्यात 251 धावांची नाबाद भागीदारी झाली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात स्मिथने कसोटी कारकिर्दीतील 31वे शतक पूर्ण केले. त्याचवेळी हेडने 150 धावा पूर्ण केल्या.

- Advertisement -

सिराजने चार विकेट घेतल्या
दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केले. ट्रॅव्हिस हेडला 163 धावांवर सिराजने बाद केले. यानंतर ग्रीनला शमीने बाद केले. शार्दुल ठाकूरने 121 धावांवर स्मिथला क्लीन बोल्ड करत मोठा अडथळा दूर केला. ऍलेक्स कॅरीने वेगवान खेळ करताना 48 धावांची खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 469 धावांपर्यंत मजल मारली. सिराजने 28.3 षटकांमध्ये 4 निर्धाव षटके टाकताना 108 धावा देत सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. याशिवाय शमी आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येक 2-2 विकेट मिळाल्या, तर जडेजाला एक विकेट मिळाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -