घरक्रीडाआरसीबीने केले नवीन लोगोचे अनावरण

आरसीबीने केले नवीन लोगोचे अनावरण

Subscribe

आरसीबीने बुधवारी अचानक सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाऊंट्सवरील प्रोफाइल फोटो आणि नाव काढून घेतले होते.मात्र आज संघाचा नवीन लोगो जाहीर केला आहे.

आरसीबीने बुधवारी अचानक सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाऊंट्सवरील प्रोफाइल फोटो आणि नाव काढून घेतले होते. संघाच्या चाहत्यांसह क्रिकेटपटू तसेच या प्रकारामुळे खुद्द आरसीबी कर्णधार विराट कोहली सुद्धा हैराण झाला होता. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आज संघाचा नवीन लोगो जाहीर केला आहे. बंगळुरूने आयपीएल २०२० च्या आधी नवीन लोगोचे अनावरण केले आहे. २९ मार्चपासून आयपीएलच्या हंगामाची सुरूवात होणार आहे.

- Advertisement -

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आज येत्या २३ मार्चपासून सुरू होणाऱ्या हंगामाच्या आधी आपला नवीन लोगो जाहीर केला. आरसीबीने काल ‘नवीन दशक, नवीन आरसीबी’ अशा वाक्याची एक पोस्ट शेअर करत, नवीन काहीतरी घेऊन येत असल्याची कल्पना सर्वांना दिली होती. त्यानुसार आरसीबीने आज त्यांच्या नवीन लोगोचे अनावरण केले आहे. त्यांनी या लोगोचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे, तसेच नंतर लोगोचा फोटोही शेअर केला आहे. या लोगोमध्ये केलेल्या काही बदलांची माहितीही आरसीबीने त्यांच्या पोस्टमधून दिली आहे. याबरोबरच त्यांनी २००८ पासून आत्तापर्यंत बदललेल्या लोगोंचाही व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे.

- Advertisement -

आरसीबीच्या या नवीन लोगोमध्ये त्यांचा प्रमुख लाल रंग बॅकग्राउंडला आहे. तसेच सोनेरी रंगाचा सिंह मागील २ पायांवर उभा असून गर्जना करत आहे. हे “धाडसी आणि निर्भय वृत्तीचे प्रतीक आहेत” असे, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे चेअरमन संजीव चुरीवाला म्हणाले. तसेच त्याखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघाचे नाव लिहिलेले आहे. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नुकतीच मुथूट फिनकॉर्प लिमिटेडबरोबर तीन वर्षांची भागीदारी जाहीर केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -