घरक्रीडा‘त्या’ खेळाडूंकडून दंड वसूल करा

‘त्या’ खेळाडूंकडून दंड वसूल करा

Subscribe

पाकिस्तान दौर्‍यावर जाण्यास नकार देणार्‍या श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद भडकला आहे. पाकिस्तान दौर्‍यावर न जाण्याचा निर्णय घेणार्‍या खेळाडूंकडून दंड वसूल करावा, असा सल्ला त्याने श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाला दिला आहे. २७ सप्टेंबरपासून श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौर्‍यावर जाणार आहे. मात्र, श्रीलंकेच्या काही खेळाडूंनी पाकिस्तान दौर्‍यावर जाण्यास नकार दिला.

त्यामुळे मियांदादने या खेळाडूंवर टीकेची झोड उठवली. आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास खेळाडूंनी प्राधान्य द्यायला हवे,असेही तो म्हणाला. यावेळी मियाँदादने पाकिस्तानी खेळाडूंनाही मोलाचा सल्ला दिला. खेळाडूंनी आगामी मालिकेवर लक्ष केंद्रीत करावे. या मालिकेसाठी जोरदार तयारी करावी. श्रीलंकेचा कोणता खेळाडू दौर्‍यावर आला नाही याचा विचार न करता खेळाडूंनी चांगला खेळ करण्यावर भर द्यावा, असेही मियांदाद म्हणाला.

- Advertisement -

श्रीलंका-पाकिस्तान यांच्यात २७ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबरदरम्यान तीन वनडे आणि तीन टी-२० सामने होणार आहेत. या दौर्‍यावर जाण्यास श्रीलंकेच्या लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, दिमुथ करुणारत्ने, निरोशान डिक्वेला, कुसल परेरा, धनंजय डिसिल्व्हा, थिसारा परेरा, अकिला धनंजय, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल यांनी नकार दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -