घरक्रीडाRishabh Pant : आयपीएलच्या 17 व्या पर्वात ऋषभ पंतवर दंडात्मक कारवाई; धीम्या...

Rishabh Pant : आयपीएलच्या 17 व्या पर्वात ऋषभ पंतवर दंडात्मक कारवाई; धीम्या गतीच्या गोलंदाजीचा फटका

Subscribe

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) प्रत्येक पर्वात अनेक खेळाडूंना मैदानात चूक केल्यास कारवाईला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या आयपीएलच्या 17 व्या पर्वात दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार ऋषभ पंत याला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) प्रत्येक पर्वात अनेक खेळाडूंना मैदानात चूक केल्यास कारवाईला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या आयपीएलच्या 17 व्या पर्वात दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार ऋषभ पंत याला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले आहे. (Rishabh Pant Fined 24 Lakhs Dc Players Face Salary Cuts In Ipl 2024 Slow Over Rate Offense After Lost From Kolkata Knight Riders Captain)

आयपीएलच्या 17 व्या पर्वातील 16 सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात कोलकाताने 272 धावांचे आव्हान दिल्लीसमोर ठेवले. या आव्हानामुळे कोलकाता सर्वाधिक धावसंख्या उभारण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहे. मात्र, या सामन्यात गोलंदाजीवेळी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कोलकाता विरुद्ध धीम्या गतीने गोलंदाजी केल्यामुळे (ओव्हर रेट) दिल्ली कॅपिटल्सवर कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – Suryakumar Yadav: हार्दिक पांड्यासाठी गूड न्युज; टी-20 चा नंबर-1 फलंदाज सूर्यकुमार यादव लवकरच परतणार

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतवर आयपीएलच्या शिस्तपालन समितीने कारवाई केली. चालू पर्वामध्ये दिल्लीने षटकांची गती धीमी राखण्याची ही दुसरी वेळ होती. ऋषभ पंतवर 24 लाख रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, चुकांची पुनरावृत्ती केल्यास कठोर दंड ठोठावला जातो. त्यामुळे या पराभवासह दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला आर्थिक आघाडीवर आणखी एक मोठा धक्का बसला.

- Advertisement -

विशेष म्हणजे दिल्लीच्या कर्णधारासह इमपॅक्ट प्लेयर, दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग इलेव्हनमधील 11 खेळाडूंनाही दंड ठोठावण्यात आला. या खेळाडूंना प्रत्येकी 6 लाख रुपये किंवा सामना फी मधील 25 टक्के रक्कम म्हणजे जी कुठली रक्कम कमी असेल, ती कापण्याचे आदेश देण्यात आले आहे.

कोलकाताने यंदाच्या पर्वामधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या उभारली. याआधी सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्स विरुद्ध आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक 277 धावा केल्या आहेत. 3 सामन्यात सलग 3 विजयांसह कोलकाताचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.


हेही वाचा – IPL 2024 DC Vs KKR: कोलकाताचा सलग तिसरा विजय, दिल्ली कॅपिटल्सवर 106 धावांनी विजय, नरेन-अंक्रिशचे अर्धशतक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -