घरक्रीडाअमेरिकन ओपनमधून फेडरर आऊट

अमेरिकन ओपनमधून फेडरर आऊट

Subscribe

वर्षाचा शेवटचा ग्रँड स्लॅम अमेरिकन ओपनच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत रॉजर फेडररला पराभवाचा धक्का बसला आहे. त्याला टेनिसच्या जागतिक क्रमवारीत ५५ व्या स्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमन याने पराभूत केले.

टेनिसचा बादशाह रॉजर फेडररला अमेरिकन ओपनच्या उप-उपांत्यपूर्व पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याचा जॉन मिलमन याने ३-६, ७-५, ७-५, ७-६ असा पराभव केला. त्यामुळे फेडररचे सहाव्यांदा अमेरिकन ओपन जिंकण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.

कसा झाला सामना

फेडरर आणि मिलमन यांच्यातील सामन्याचा पहिला सेट फेडररने अगदी सहजतेने ६-३ असा जिंकला. पण हा पहिला सेट गमावणाऱ्या मिलमनने हार मानली नाही. दुसऱ्या सेटमध्ये त्याने चांगले पुनरागमन केले. या सेटमध्ये रॉजर फेडररला चांगली सर्विस करता आली नाही. याचा फायदा घेत मिलमनने हा सेट ७-५ असा जिंकला. तर तिसऱ्या सेटमध्येही काहीसे असेच चित्र होते. चौथ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ केला. दोघांनीही प्रतिस्पर्धीला आपली सर्विस मोडू दिली नाही. त्यामुळे हा सेट टाय-ब्रेकरमध्ये गेला. ज्यात (७-३) अशी बाजी मारत मिलमनने हा सेट आणि सामनाही जिंकला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -