घरदेश-विदेश'मिग २७' लढाऊ विमानाला जोधपूरमध्ये अपघात!

‘मिग २७’ लढाऊ विमानाला जोधपूरमध्ये अपघात!

Subscribe

आज सकाळी अपघातग्रस्त झालेले 'मिग २७' हे लढाऊ विमान त्याच्या नियमीत मिशनवर असताना, जोधपूरच्या देवलिया गावाजवळ क्रॅश झाले.

भारतीय वायुसेनेचे ‘मिग २७’ हे लढाऊ विमान राजस्थानच्या जोधपूरमध्ये अपघातग्रस्त झाले. आज सकाळी घडलेल्या या अपघातात मिग २७ हे विमान पूर्णत: जळून खाक झाले. ही घटना घडताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या. दरम्यान घटनास्थळावरील परिस्थीती सध्या आटोक्यात आल्याची महिती मिळते
आहे. अपघातग्रस्त मिग २७ हे लढाऊ विमान त्याच्या नियमीत मिशनवर असताना, जोधपूरच्या देवलिया गावाजवळ क्रॅश झाले. यावेळी झालेल्या स्फोटाच्या मोठ्य़ा आवाजाने आसपासच्या परिसरातील लोकांना याविषयी माहिती मिळाली.


जीवितहनी नाही

दरम्यान मिग २७ विमानाच्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विमानातील पायलट्सनी क्रॅशअाधीच विमानातून एक्झिट घेतल्यामुळे ते सुरक्षित असल्याचा माहिती समोर आली आहे. या अपघातासंदर्भात अधिक तपास करण्याचे आदेश वायूदलाने दिले आहेत. ‘मिग’ विमानांचा अपघात होण्याचे प्रमाण मागील काही काळात वाढले आहे. मध्यंतरीच हिमाचल प्रदेशातील कांगडा इथे झालेल्या ‘मिग २१’ विमानाच्या अपघातात पायलटचा मृत्यू झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -