घरक्रीडाविराटनंतर 'खास' क्लबमध्ये रोहित शर्मादेखील दाखल

विराटनंतर ‘खास’ क्लबमध्ये रोहित शर्मादेखील दाखल

Subscribe

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० रन्स बनविणारा विराट कोहलीनंतर रोहित शर्मा हा दुसरा भारतीय तर जगातील पाचवा बॅट्समन ठरला आहे.

सलामीवीर बॅट्समन रोहित शर्माचं नाव टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नव्या क्लबमध्ये दाखल झालं आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० रन्स बनविणारा विराट कोहलीनंतर रोहित शर्मा हा दुसरा भारतीय तर जगातील पाचवा बॅट्समन ठरला आहे. भारत विरुद्ध इंग्लंडच्या तिसऱ्या टी – २० मॅचमध्ये आपल्या १४ रन्स पूर्ण केल्यानंतर हा २००० रन्सचा टप्पा त्यानं गाठला आहे. आतापर्यंत रोहित शर्मानं भारतासाठी ८४ टी-२० मॅच खेळल्या असून ३२.५९ रन रेटनं २०८६ रन्स बनविले आहेत. यामध्ये तीन शतक तर १५ अर्धशतकांचा समावेश आहे. ११८ हा टी – २० मधील रोहितचा सर्वोत्तम स्कोअर असून १९० फोर्स तर ८९ सिक्सचा यामध्ये समावेश आहे.

रोहित दुसरा भारतीय बॅट्समन

रोहित शर्माच्या आधी न्यूझीलंडचा ब्रॅडन मॅकलम आणि मार्टिन गुप्टिल, पाकिस्तानचा शोएब मलिक आणि भारतीय कॅप्टन विराट कोहलीचा २००० रन्स करण्यामध्ये क्रमांक लागतो. आश्चर्याची बाब म्हणजे भारतीय कॅप्टन विराट कोहलीनंदेखील आपल्या २००० रन्सचा टप्पा इंग्लंडविरुद्धच पूर्ण केला होता. मात्र त्यानं हा टप्पा ५६ मॅचमध्येच पूर्ण केला. तर रोहित शर्मा आता हा टप्पा पार करणारा दुसरा भारतीय बॅट्समन ठरला आहे. दरम्यान न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टीलनं २२७१ रन्स ७३ मॅचमध्ये, ब्रँडन मॅकलमनं २१४० रन्स ७१ मॅचेमध्ये, तर शोएब मलिकनं २००० रन्स ५९ मॅचमध्ये पूर्ण केल्या आहेत.

- Advertisement -

तिसऱ्या टी-२० चा हिरो ठरला रोहित

भारत विरुद्ध इंग्लंडच्या टी – २० सिरीजमध्ये भारतानं २-१ असा विजय मिळवला. रोहित शर्माने नाबाद राहत ५६ बॉलवर १०० धावा ठोकल्या. ११ फोर आणि ५ गगनचुंबी सिक्सर लगावत रोहितने इग्लंडच्या बॉलर्सची अक्षरशः धुलाई केली. सुरुवातील शिखर धवन स्वस्तात आऊट झाल्यानंतर लोकेश राहुल, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्यासोबत रन रेट सांभाळत १९ व्या ओव्हरलाच भारताला विजय मिळवून दिला. सामनावीर आणि मालिकावीर असे दोन्ही पुरस्कार रोहित शर्माला मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -