घरक्रीडारोहित राजस्थानविरुद्ध खेळणार - झहीर खान

रोहित राजस्थानविरुद्ध खेळणार – झहीर खान

Subscribe

आयपीएल संघ मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा पायाच्या दुखापतीमुळे किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या बुधवारी झालेल्या सामन्यात खेळला नव्हता. सरावादरम्यान झालेल्या या दुखापतीमुळे तब्बल ११ मोसमांत पहिल्यांदाच रोहित आयपीएलच्या सामन्याला मुकला. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, रोहित आता फिट असून तो शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार्‍या सामन्यासाठी उपलब्ध आहे, अशी माहिती मुंबई इंडियन्सचा संचालक झहीर खानने दिली.

रोहित राजस्थाविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध आहे. त्याला या सामन्यात खेळण्याबद्दल विश्वास आहे आणि ही आमच्या संघासाठी आनंदाची बातमी आहे. त्याने आता सराव केल्यानंतर तो किती फिट आहे, याची जास्त कल्पना येईल.

- Advertisement -

मात्र, तो या सामन्यात खेळेल असा त्याच्याबरोबरच आम्हालाही विश्वास आहे, असे झहीर शुक्रवारी म्हणाला. पंजाबविरुद्ध रोहितच्या अनुपस्थितीत किरॉन पोलार्डने मुंबईचे नेतृत्त्व केले होते आणि त्याने या सामन्यात अवघ्या ३१ चेंडूत ८३ धावा करत मुंबईला विजय मिळवून दिला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -