घरक्रीडाहैदराबादची बिर्याणी राजस्थानसमोर शिजलीच नाही!

हैदराबादची बिर्याणी राजस्थानसमोर शिजलीच नाही!

Subscribe

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्ससाठी शनिवारचा दिवस सुपर सॅटर्डे ठरला. पाहुण्या सनरायजर्स हैदराबादला ७ विकेट्सने हरवत राजस्थान रॉयल्सनं गुणतालिकेत थेट सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे टॉप ४ टीममध्ये आपण अजूनही प्रवेश करू शकतो, हेच राजस्थाननं या विजयातून पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. दुसरीकडे हैदराबादला मात्र या पराभवामुळे यंदाच्या हंगामात कडवं आव्हान निर्माण झालं आहे.

टॉस जिंकल्यानंतर राजस्थानचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथनं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. वरून अॅरॉन, थॉमस, उनाडकट, गोपाल, रियान पराग, स्टुअर्ट बिन्नी अशी तगडी बॉलिंगची बाजू असल्यामुळे स्मिथचा हा निर्णय रास्तच होता. चौथ्याच ओव्हरमध्ये त्याचा पुरावा देखील मिळाला. थॉमसनं कॅप्टन विल्यम्सनचा(१३) अडथळा दूर केला. मात्र, राजस्थानचा हा आनंद फार काळ टिकला नाही. त्यानंतर आलेल्या मनीष पांडेसोबत डेविड वॉर्नरनं डाव सावरायला सुरुवात केली. मनीश पांडेनं आक्रमक बॅटिंग करत राजस्थानच्या बॉलर्सचं चांगलंच घामटं काढलं.

- Advertisement -

१३व्या ओव्हरमध्ये हैदराबादच्या १०० धावा फलकावर लागल्यानंतर डेविड वॉर्नर आऊट झाला. तर फक्त ३६ बॉलमध्ये ६१ रन करणाऱ्या पांडेला थेट १५व्या ओव्हरमध्ये गोपालनं आऊट केलं. त्यानंतर जणूकाही बाद होण्याची स्पर्धा लागावी अशा पद्धतीने एकामागोमाग अशी हैदराबादची मधली फळी तंबूत परतली. पुढच्या १९ बॉलमध्ये हैदराबादनं ४ विकेटच्या बदल्यात फक्त १२ धावांची भर घातली. शेवटच्या षटकात राशीद खाननं फटकेबाजी करत हैदराबादचा स्कोअर १६० पर्यंत नेऊन ठेवला. राजस्थानकडून अेरॉन, थॉमस, गोपाल आणि उनाडकट या चौघांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

२० ओव्हरमध्ये १६१ रनांचं आव्हान घेऊन राजस्थान रॉयल्सची सलामीची जोडी अजिंक्य राहाणे आणि लियाम लिव्हिंगस्टन मैदानात उतरली. सुरुवातीपासूनच या जोडीने आक्रमक रूप धारण केलं होतं. पहिल्या पॉवर प्लेमध्येच राजस्थानच्या ६० धावा फलकावर लागल्या होत्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७८ रनांची पार्टनरशिप केल्यानंतर १०व्या ओव्हरमध्ये राशीद खाननं लिव्हिंगस्टोनचा बाद केलं. त्याने फक्त २६ बॉलमध्ये ४४ धावा फटकावल्या, ज्यामध्ये ३ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -