घरक्रीडापृथ्वी शॉचे मास्टर ब्लास्टरकडून कौतुक

पृथ्वी शॉचे मास्टर ब्लास्टरकडून कौतुक

Subscribe

भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉने आपल्या आंतराष्ट्रीय पदार्पणाच शतक झळकावले. त्याने केलेल्या शतकाचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही कौतुक केले.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात युवा फलंदाज पृथ्वी शॉने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणातच त्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला जे जमले नाही ते केले. त्याने या सामन्यात शतक झळकावले. त्याच्या या कामगिरीचे मास्टर ब्लास्टर सचिनने कौतुक केले.

असाच बिनधास्त खेळत रहा

पृथ्वी शॉ अगदी लहान असल्यापासून त्याची तुलना सचिन तेंडुलकरशी केली जाते. त्याची फलंदाजीची शैली आणि तो छोट्या चणीचा असल्यामुळे त्याची तुलना सचिनशी होते. सचिननेही पृथ्वीला वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. त्याने पृथ्वीला आपली खेळण्याची शैली कधीही बदलू नको असा सल्ला दिला होता. त्यामुळे पृथ्वीने आंतरराष्ट्रीय पदार्पणात आपल्या आक्रमक शैलीत शतक झळकावल्यानंतर सचिनने लगेच ट्विट करून त्याचे कौतुक केले.

असाच प्रगती करत रहा 

पृथ्वी शॉचे कौतुक करणाऱ्यांमध्ये ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांचाही समावेश होता. अमिताभ बच्चन हे खेळांचे खूप मोठे चाहते आहेत. त्यामुळे ते प्रत्येक सामन्यावर लक्ष ठेवून असतात. त्यातच तो सामना भारताचा असेल तर अमिताभ तो सामना आवर्जून पाहतात. पृथ्वीने शतक झळकावताच अमिताभ बच्चननी त्याचे कौतुक करणारे ट्विट केले. ज्यात त्यांनी तू असाच प्रगती करत रहा असे लिहले होते.

 

- Advertisement -

अभी तो बस शुरवात है 

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही पृथ्वी शॉचे कौतुक करणारे ट्विट केले. वीरेंद्र सेहवागप्रमाणेच पृथ्वी शॉ हा आक्रमक सलामीवीर आहे. त्यामुळे साहजिकच सेहवागला पृथ्वीची फलंदाजी आवडत असणार.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -