घरक्रीडासचिन तेंडुलकरला बंगल्यावर चढवता येणार 'इतके' मजले; अटी, शर्तींवर BMCने दिली परवानगी

सचिन तेंडुलकरला बंगल्यावर चढवता येणार ‘इतके’ मजले; अटी, शर्तींवर BMCने दिली परवानगी

Subscribe

मुंबई : भारतरत्न सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) वांद्रे (Bandra) येथील त्याच्या बंगल्याचे काही मजले वाढविण्यासाठी इच्छा होती आणि यासाठी महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकरचे पाच मजल्यांपर्यंत बांधकाम वाढविण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

वांद्रे पश्चिममधील पेरी क्रॉस रोडवरील सचिन तेंडुलकर यांच्या बंगल्याच्या जागी आधी दोराब व्हिला हा बंगला होता. या बंगल्याच्या जागी तेंडुलकर याने भव्य बंगला बांधला. परंतु सागरी नियमन क्षेत्रात (सीआरझेड २) हा बंगला येतो. आधी दोराब व्हिला बंगल्यासाठी एक इतका चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) होता. त्यानुसार तेंडुलकर याने सहा हजार चौरस फूट जागेत तळमजला आणि साडेतीन मजल्याचे बांधकाम केले. यासाठी बांधकामासाठी त्याला २००७ मध्ये मंजुरी मिळाली होती. मात्र २०१९ मध्ये नियमात बदल होऊन ०.५ इतका वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक देण्यात आले आहेत. त्यामुळे तेंडुलकर आणि त्यांची पत्नी डॉ. अंजली यांनी महापालिका व सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडे वाढविण्यासाठी अर्ज केला होता.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2023 : गुजरात टायटन्सचा फिरकीपटू राशिद खानची पहिली हॅट-ट्रिक

पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दराडे यांनी नियमांचे पालन करण्याच्या सूचना देताना गेल्या महिन्यात बंगल्याचे बांधकाम वाढविण्यासाठी तेंडुलकर याला मंजूरी दिल्याचे सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, २०१९ मधील सीआरझेड अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी, शर्तींचे पालन करूनच वाढीव बांधकाम करावे लागणार आहे. याशिवाय वाढीव बांधकाम तयार करताना होणारा मलबा सीआरझेड क्षेत्रात टाकू नये असेही सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

अमिताभ बच्चन आणि सिरिल श्रॉफ यांनाही परवानगी
पर्यावरण विभागाकडून अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या विलेपार्ले येथील कपोई हाउसिंग सोसायटीत असलेल्या बंगल्यात वाढीव बांधकाम करण्यास मंज़ुरी देण्यात आली आहे. याशिवाय उद्योगपती गौतम अदानी यांचे व्याही सिरिल श्रॉफ जे आघाडीचे वकील आहेत. त्यांच्या वरळी सीफेसवरील बंगल्याच्या वाढीव बांधकामासही मंजुरी देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -