घरक्रीडाभारताला जेतेपद

भारताला जेतेपद

Subscribe

सॅफ फुटबॉल स्पर्धा

भारताच्या संघाने पहिल्यांदा सॅफ १८ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. रविवारी झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा २-१ असा पराभव केला. भारताच्याच निंथोइंगनबा मीतेला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला.

अंतिम सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारताने आक्रमक खेळ केला. याचा फायदा त्यांना दुसर्‍याच मिनिटाला मिळाला, जेव्हा विक्रम प्रताप सिंहने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर बांगलादेशने चांगले पुनरागमन केले. ४० व्या मिनिटाला येसीन अराफतने गोल केला आणि बांगलादेशला १-१ अशी बरोबरी करून दिली.

- Advertisement -

मध्यंतरानंतर भारताने उत्तम खेळ केला. मात्र, त्यांना गोल करण्यात अपयश येत होते. अखेर ९० मिनिटांनंतरच्या अतिरिक्त वेळेत रवी बहादूर राणाने अप्रतिम फटका मारत भारताचा दुसरा गोल केला. बांगलादेशला पुनरागमनाची संधी मिळाली नाही आणि भारताने हा सामना २-१ असा जिंकला.

मी याआधीही म्हणालो होतो की, सॅफ स्पर्धा जिंकण्यासाठी एखादा अप्रतिम गोल करावा लागेल. अखेर रवीने तो अप्रतिम गोल करत आम्हाला सामना जिंकवून दिला, असे सामन्यानंतर भारताचे प्रशिक्षक फ्लॉइड पिंटो म्हणाले. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी या युवा संघाचे अभिनंदन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -