घरक्रीडाQatar Open : सानिया मिर्झा-आंद्रेया क्लेपॅक जोडीचा उपांत्य फेरीत प्रवेश 

Qatar Open : सानिया मिर्झा-आंद्रेया क्लेपॅक जोडीचा उपांत्य फेरीत प्रवेश 

Subscribe

सानिया-आंद्रेयाने उपांत्यपूर्व फेरीत अ‍ॅना ब्लिंकोव्हा-गॅब्रिएला दाब्रोव्हस्कीवर ६-२, ६-० अशी मात केली.

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने आपला चांगला खेळ सुरु ठेवला आहे. तिने स्लोव्हेनियाची टेनिसपटू आंद्रेया क्लेपॅकच्या साथीने खेळताना कतार ओपन स्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सानिया-आंद्रेयाने महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत चौथ्या सीडेड अ‍ॅना ब्लिंकोव्हा आणि गॅब्रिएला दाब्रोव्हस्कीवर ६-२, ६-० अशी सरळ सेटमध्ये मात केली. त्याआधी सोमवारी सानियाने डब्ल्यूटीए स्पर्धेत विजयी पुनरागमन केले होते. सानिया-आंद्रेया या जोडीने युक्रेनची जोडी नादिया किचेनॉक आणि ल्युडमेला किचेनॉकला ६-४, ६-७ (५-७), १०-५ असे पराभूत केले. सानियाचा हा १२ महिन्यांतील पहिला सामना होता.

- Advertisement -

टेनिस कोर्टवर दमदार पुनरागमन 

कोरोनामुळे टेनिसच्या स्पर्धा बंद झाल्या होत्या. त्याआधी सानियाने अखेरचा सामना हा कतार ओपनमध्येच खेळला होता आणि आता तिने याच स्पर्धेतून टेनिस कोर्टवर पुनरागमन केले. यावर्षाच्या सुरुवातीला सानियाला कोरोनाची बाधाही झाली होती. परंतु, तिने कतार ओपनमध्ये अप्रतिम खेळ केला आहे. तिने आंद्रेया क्लेपॅकच्या साथीने खेळताना या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -