घरक्रीडाIND vs SA: शार्दुल ठाकूर आणि आर अश्विनला जोहान्सबर्ग कसोटीतून डच्चू मिळण्याची...

IND vs SA: शार्दुल ठाकूर आणि आर अश्विनला जोहान्सबर्ग कसोटीतून डच्चू मिळण्याची शक्यता, कोणाला मिळणार संधी?

Subscribe

सेंच्युरियन कसोटीत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार विराट कोहली यांचं लक्ष असणार आहे. जोहान्सबर्गची स्थिती आणि खेळपट्टी पाहता प्लेइंग-११ मध्ये दोन मोठे बदल केले जाऊ शकतात. शार्दुल ठाकूरऐवजी वेगवान गोलंदाज उमेश यादवचा संघात समावेश केला जाऊ शकतो. तर आर अश्विनच्या जागेवर वेगवान फलंदाज हनुमा विहारीला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जेव्हापण विराट कोहली परदेशातील कसोटीसाठी प्लेइंग-११ खेळाडू निवडतो. तेव्हा त्याला पाचवा गोलंदाज म्हणून अष्टपैलू खेळाडूला संधी द्यायला आवडते. यामुळे संघाचा बॅलन्स व्यवस्थित ठेवण्यास मदत होते. या कारणामुळे शार्दुल ठाकूरला प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळाले आहे.

- Advertisement -

शार्दुलच्या जागी उमेश यादवला संधी?

सेंच्युरियन कसोटी सामन्यात शार्दुल ठाकूरला गोलंदाजी आणि फलंदाजीत फारसा प्रभाव पाडता आलेला नाहीये. त्याने १४ धावा काढत १६ ओव्हर्सची गोलंदाजी करत फक्त २ विकेट्स घेतल्या आहेत. उमेश यादव १४० किमीच्या वेगाने प्रतितास गोलंदाजी करू शकतो. त्याची बॉलिंग जोहान्सबर्गमध्ये समोरच्या खेळाडूंवर दबाव आणू शकते.

अश्विनच्या जागी हनुमा विहारीला संधी ?

सेंच्युरियन कसोटीत टीम इंडियाचा फिरकीपटू आर. अश्विनला संधी देण्यात आली होती. कसोटीच्या दुसऱ्या सामन्यात अश्विनने शेवटच्या दोन फलंदाजांना बाद केले होते. परंतु पहिल्या डाव्यात त्याने १३ ओव्हर्स टाकल्या मात्र विकेट्स घेण्यात एकातही यश मिळालं नाही. त्यामुळे आता अश्विनच्या जागी विहारीला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Omicron Variant : पहिल्यांदाच दिल्ली आणि मुंबईमध्ये ट्रान्समिशन रेट २ च्या पार, जाणून घ्या आर व्हॅल्यूचं महत्त्व?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -