घरताज्या घडामोडीहर्बल वनस्पती, क्रुझ पार्टीत ड्रग्ज घेऊन शपथनामा लिहिला का?, मुनगंटीवारांचा पवारांसह अनिल...

हर्बल वनस्पती, क्रुझ पार्टीत ड्रग्ज घेऊन शपथनामा लिहिला का?, मुनगंटीवारांचा पवारांसह अनिल परबांवर निशाणा

Subscribe

संजय राऊतांना गांभीर्याने घेऊ नये - सुधीर मुनगंटीवार

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या ७० दिवांपासून आंदोलन सुरुच ठेवलं आहे. एसटीचे शासकीय सेवेत विलिनीकरण करण्यात यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना मोठी आश्वासने दिली होती. तसेच सरकारच्या शपथनामामध्येही कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा देण्याबाबत उल्लेख केला आहे. हा शपथनामा हर्बल वनस्पती घेऊन किंवा क्रुझ पार्टीत ड्रग्ज सेवन करुन लिहिण्यात आला नाही ना? असा सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. दरम्यान मुनगंटीवार यांनी थेट राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे.

भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन थेट राज्य सरकार आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मुनगंटीवार म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत सामंजस्याने विचार केला पाहिजे. एसटी कर्मचाऱ्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत. त्या तुम्ही शपथनामामध्ये निश्चित देऊ असे म्हटलं आहे. एसटी कामगारांच्या संमेलनात जाऊन मोठी मोठी भाषणे केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब स्वतः म्हणाले आहेत की, कर्मचाऱ्यांना राज्य आणि केंद्राच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देऊ मग तुम्ही शपथनामामध्ये लिहिता ते हर्बल वनस्पती घेऊन आणि क्रूझच्या ड्रग्ज पार्टीमध्ये ड्रग्जचे सेवन करुन लिहित नाही. अशा प्रसंगात तुम्ही सांगितले यावरची कृती करणं महत्त्वाचे असल्याचे मुनगंटीवार म्हणाले आहेत.

- Advertisement -

राऊतांना गांभीर्याने घेऊ नये

शिवसेनेशी असलेली युती आमची एतिहासिक चूक होती असे मुनगंटीवार यांनी म्हटलं होते यावर राऊतांनी प्रत्युत्तर देताना माणसाचं मन भरकटल की माणसं गांजा प्यायल्यासारखी बोलतात राजकारणात विरोधी ज्या पद्धतीने भरकटला आहे. ते पाहता त्यांच्याकडून आपण कोणत्या वक्तव्याची अपेक्षा ठेवणार? असा सवाल राऊतांनी केला होता. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शिवसेना खासदार संजय राऊत काय म्हणतात यावर भाष्य करण्याची गरज नाही. डॉक्टरपेक्षा कंम्पाऊंडर बरा, हरामखोर या शब्दाचा अर्थ नॉटी आहे. पाप केल्याने कोरोना होतो. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेऊ नये असा घणाघात सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.


हेही वाचा : Maharashtra Lockdown: दिलासादायक! राज्यात लॉकडाऊन लागू करण्याबाबत सध्या कुठलाही विचार नाही, पण….- राजेश टोपे

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -