घरक्रीडाIND vs AUS : शॉन मार्शला सलामीला संधी; ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांचे संकेत

IND vs AUS : शॉन मार्शला सलामीला संधी; ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांचे संकेत

Subscribe

मार्श जवळपास दोन वर्षे ऑस्ट्रेलियन संघाच्या बाहेर आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र, या मालिकेला सुरुवात होण्याआधीच ऑस्ट्रेलियाचा संघ अडचणीत सापडला आहे. त्यांचा प्रमुख सलामीवीर डेविड वॉर्नर दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात वॉर्नरसह जो बर्न्स आणि विल पुकोवस्की या सलामीवीरांचा समावेश होता. मात्र, भारताविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात पुकोवस्कीच्या डोक्याला चेंडू लागला होता. त्यामुळे कन्कशनच्या नियमानुसार पुकोवस्की सध्या सुरु असलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात खेळू शकला नाही. तसेच तो पहिल्या कसोटीत खेळण्याबाबत साशंकता आहे. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात अनुभवी फलंदाज शॉन मार्शला सलामीला संधी मिळू शकेल, असे संकेत ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी दिले आहेत.

‘कसोटी संघात निवड व्हावी यासाठी शॉन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्याने शेफील्ड शिल्ड स्पर्धेत केवळ यावर्षीच नाही, तर मागील वर्षीही दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला कसोटी संघात नक्कीच पुन्हा संधी मिळू शकेल,’ असे लँगर म्हणाले. ३७ वर्षीय मार्शने यंदा ऑस्ट्रेलियातील स्थानिक स्पर्धा शेफील्ड शिल्डमध्ये अप्रतिम कामगिरी केली असून त्याने मागील चार पैकी तीन सामन्यांत शतके केली आहेत. मात्र, मार्श जवळपास दोन वर्षे ऑस्ट्रेलियन संघाच्या बाहेर आहे. त्याने अखेरचा कसोटी सामना जानेवारी २०१९ मध्ये खेळला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -