घरक्रीडाश्रेयस अय्यरवर ८ एप्रिलला शस्त्रक्रिया; खांद्याला झाली दुखापत

श्रेयस अय्यरवर ८ एप्रिलला शस्त्रक्रिया; खांद्याला झाली दुखापत

Subscribe

श्रेयस इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या आगामी मोसमाला मुकणार आहे.

भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरवर ८ एप्रिलला शस्त्रक्रिया होणार आहे. नुकतीच भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका पार पडली. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयसच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला या एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांत खेळता आले नाही. तसेच तो इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या आगामी मोसमालाही मुकणार आहे. आता त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याने त्याला काही काळ मैदानाबाहेर राहावे लागणार आहे.

लँकेशायरने दिल्या शुभेच्छा 

श्रेयसच्या खांद्याला दुखापत असून ८ एप्रिलला त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. शस्त्रक्रिया झाल्यावर श्रेयसला किमान चार महिने मैदानाबाहेर राहावे लागणार आहे. यंदा तो इंग्लंडमधील कौंटी संघ लँकेशायरकडून एकदिवसीय स्पर्धेत खेळणार होता. मात्र, आता त्याला आयपीएलनंतर या स्पर्धेलाही मुकावे लागण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, लँकेशायरने श्रेयसला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

श्रेयसच्या अनुपस्थितीत पंत कर्णधारपदी

श्रेयस यंदा आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही आणि त्याच्या अनुपस्थितीत युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतची दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. श्रेयसच्या नेतृत्वात दिल्लीच्या संघाने मागील वर्षी आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती. यंदा तो या स्पर्धेत खेळू शकणार नसल्याने दिल्ली संघाला मोठा धक्का बसला आहे. परंतु, पंतच्या नेतृत्वात दिल्लीचा संघ आता कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -