Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन कोरोना संकटातही २३ एप्रिललाच थलायवी रिलिज करणार- कंगणाचा फाजील हट्ट

कोरोना संकटातही २३ एप्रिललाच थलायवी रिलिज करणार- कंगणाचा फाजील हट्ट

पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करु शकेल हे कठीण आहे. कारण चित्रपट कितीही चांगला असला तरी प्रेक्षकांना आपला जीव हा म्हत्त्वाचा आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडची क्वीन कंगना रणावत ही तिच्या बेधडक अंदाजामुळे प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरते. जबरदस्त आत्मविश्वासाने तिने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. कंगणाने सिनेसृष्टीत ठामपणे काम करणे नेहमीच पसंद केले आहे. आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व निर्माते चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ठकलत आहे. मात्र तरीही कंगना तिच्या ‘थलाइवी’ या चित्रपटाला प्रदर्शित करण्यासाठी हट्ट करत आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती रुग्णसंख्या, लॉकडाउनचे संकट समोर उभे असतानाही कंगना २३ एप्रिल रोजी तिचा आगामी ‘थलाइवी’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा फाजील हट्ट करत आहे. कंगनाचा हा आत्मविश्वास सर्वांच्या पसंतीस येत आहे. यावर तिचे कौतुकही केले जात आहे.

- Advertisement -

बराच काळ रखडलेले काही चित्रपट अखेर मार्च महिन्यात प्रदर्शित करण्यात आले. त्यामुळे आता कंगनाही तिच्या आत्मविश्वासाच्या जोरावर थलाइवी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करायचा आहे. यात कंगनाही तिच्या आयुष्यातील उत्कृष्ट सादरीकरण देईल. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करु शकेल हे कठीण आहे. कारण चित्रपट कितीही चांगला असला तरी प्रेक्षकांना आपला जीव हा म्हत्त्वाचा आहे. त्यामुळे कंगनाचा हा हट्ट पूर्ण होईल का हे येत्या काही दिवसात लवकरच पाहायला मिळेल.


हे वाचा- हॉट अवतारात मलाईकाने घेतली कोरोना लस

- Advertisement -